Marathi News Update: एकीकडे निवडणूक आयोगाने निवडणूक रोख्यांचा तपशील संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर त्यावरून राष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती व महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र चालू आहे. दोन्ही आघाड्यांकडून अद्याप अंतिम जागावाटप जाहीर करण्यात आलेलं नसून टप्प्याटप्प्याने उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जागावाटपाचं अंतिम चित्र समोर येण्यासाठी मतदार व राज्याच्या नागरिकांची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.
Maharashtra News Today 15 March 2024: मविआ व महायुतीच्या जागावाटपाचे सर्व अपडेट एका क्लिकवर!
भंडारा : लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. उद्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊन आचारसंहिताही लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय परिघात लगबग वाढली आहे. त्यातच युतीची दुसरी यादी जाहीर झाली असून या यादीतही भंडारा गोंदिया- मतदार संघाचे नाव नसल्याने आता अनेक शंका कुशंकाना पेव फुटले आहेत.
नागपूर: उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात शुक्रवारी दिवसाढवळ्या एका तरुणाला गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्यावर तलवारीने हल्ला करण्यात आला. कामगार नगर चौकातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक वसाहती मधील कॅलेक्सी कंपनीला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली.
नागपूर : राज्यातील आर्य वैश्य (कोमटी) समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण सुरू केले आहे.
वाहिकेमधून उच्च दाबाने गॅस बाहेर पडू लागल्याने काही वेळ परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
नागपूर : भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर चौधरी यांनी दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले. त्यांनी हवाई दलाच्या अनुरक्षण कमानच्या मुख्यालयाला भेट दिली आणि देशभरातील हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित केले.
भंडारा : घरची कामे आटोपून गावालगतच्या नाल्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा नाल्यातील खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना शुक्रवार १५ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील बोथली /धर्मापुरी येथे घडली. आई सुषमा उर्फ विद्या विजय मेश्राम (३९) तर मुलगी दिव्या विजय मेश्राम वय (१६) अशी मृतक मयलेकिंची नावे आहे.
नागपूर : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा राज्याच्या दरवाजा ठोठावला आहे. एकीकडे तापमानाचा पारा वाढत असतानाच भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाच्या आगमनाची वर्दी दिली आहे. याचा मोठा फटका विदर्भातील चार जिल्ह्यांना बसू शकतो.
वीज पुरवठा तोडलेल्या ग्राहकांनी चोरून वीज घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर विद्युत कायद्याने फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.
पनवेल : नवी मुंबईला जागतिक दर्जाची क्रीडानगरी बनवण्याचा संकल्प सिडको महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा...
नवी मुंबई : कोपरी भागातून एका तीन वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. याबाबत माहिती मिळताच तत्काळ हालचाल केल्याने मुलीचा शोध घेण्यात यश आले आहे. तर एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात अन्य एक आरोपी अद्याप फरार आहे.
कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारात शिवसेनेचे नेते महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे जखमी झाले होते.
पुणे : किरकोळ बाजारात कांद्याची दरवाढ होऊन कांदा दर्जानिहाय प्रति किलो २० ते ३४ रुपयांवर गेला आहे. नाशिक परिसरात महिनाभरापासून कांद्याचा विक्री दर १५०० ते १६०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहे. यंदा देशात सुमारे ४७ लाख टनांनी कांदा उत्पादनात घट होऊन २५४.७३ लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
सविस्तर वाचा...
बुलढाणा: लोकसभा निवडणूक लढविणेच नव्हे तर उमेदवारी अर्ज भरणे देखील सोपे नाही. यासाठी मोठी कसरत व भारंभार कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. यंदाच्या निवडणुकीत त्यात आणखी एका प्रमाणपत्राची भर पडलीय! आता उमेदवारांना शासकीय निवासस्थानाचे नादेय प्रमाणपत्र (नो ड्युज सर्टिफिकेट) सुद्धा सादर करावे लागणार आहे.
जळगाव : शिवलिंग आणण्यासाठी मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे जाणार्या शिवभक्तांच्या मोटारीला शुक्रवारी पहाटे वाळूने भरलेल्या मालमोटारीची जळगावच्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावानजीक जोरदार धडक बसली.
मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या सर्वच प्रवासी बसगाड्यांची कालमर्यादा उच्च न्यायालयाने २००४ मध्ये आठ वर्षे केली होती. मात्र, वायू प्रदूषण रोखणारी यंत्रणा बसगाड्यांमध्ये नसल्यामुळे ही अट त्यावेळी घालण्यात आली होती.
नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बहुसंवर्गीय भरती प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रथम संवर्गाचा पसंतीक्रम सादर करण्याचा नियम आहे. असे असतानाही आयोगाने संयुक्त परीक्षा गट-ब परीक्षेतील चारही संवर्गाचा निकाल एकत्र जाहीर न करता आणि उमेदवारांकडून कुठल्याही पदासाठी पसंतीक्रम न मागता थेट गुणवत्ता यादी जाहीर करून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (ऑप्टिंग आऊट) पर्याय दिला.
धुळे : कांदा निर्यातीच्या व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे आमिष दाखवून १० जणांनी धुळे तालुक्यातील नेर येथील एका व्यापाऱ्याला सुमारे ५८ लाख रुपयांना फसविले.
भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करणारे निलेश सांबरे यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी डॉ. सुभाष चौधरी यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदावरून निलंबित करण्याचा आदेश अवैध ठरवून रद्द केला. कुलगुरू हे महत्त्वाचे पद असल्याने निलंबनाने पदाची प्रतिष्ठा खालावते. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून असा निर्णय घ्यावा, अशा शब्दात न्यायालयाने कानउघाडणी केली.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभीनाका येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहेत.
नागपूर : उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शुक्रवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याने तर्कवितर्क लावले जात आहे. दरम्यान ग्राम सडक योजनेच्या कामानिमित्त फडणवीस यांची भेट घेतल्याचे पारवे यांनी सांगितले
मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून राबविण्यात येत असलेला बोरीवली-ठाणे हा बहुचर्चित बोगद्याचा प्रकल्प निवडणुक भ्रष्टाचाराचे मोठे उदाहरण असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मी माझी भूमिका मविआतल्या नेत्यांसमोर मांडली आहे. मला वाटतं मला संधी मिळेल. मला पुणेकरांच्या भल्यासाठी निवडणूक लढवायची आहे. आता हे नेते योग्य तो मार्ग काढतील. अजून कोणत्याही पक्षात जाण्याचा मी निर्णय घेतलेला नाही. पुण्यात वॉशिंग मशीन नको ही सगळ्यांचीच भूमिका आहे. तीच भूमिका डोळ्यांसमोर ठेवून मी भेटीगाठी घेत आहे - वसंत मोरे
नागपूर : नागपुरात गेल्या महिन्याभरातील ३७ हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर मेडिकलच्या श्वसन, फुफ्फुस व निद्रारोग विभागाने अभ्यास केला. त्यात रक्तदाब, मधुमेहासह इतर जोखमीतील रुग्णांना भयावह स्वप्न पडत असल्यास हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असल्याचे पुढे आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत होणार आहे. या यात्रेनिमित्ताने भिवंडी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
नागपूर : अंबाझरीतील टिळकनगरात असलेल्या ड्रीम फॅमिली स्पा-मसाज सेंटरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ‘सेक्स रॅकेट’ सुरु होते. या मसाज सेंटरमध्ये आंबटशौकीन ग्राहकांसाठी विवाहित महिला आणि महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार करवून घेण्यात येत होता. गुन्हे शाखेने या सलूनवर छापा घालून तीन तरुणींची सुटका केली.
नागपूर : २००९ ते २०१९ या पंधरा वर्षात झालेल्या लोकसभेच्या तीन निवडणुकांमध्ये नागपुरात भाजपच्या मतांमध्ये दुपटीने वाढ झाली तर काँग्रेसच्या मतांमध्ये कधी वाढ तर कधी घट झाल्याचे दिसून येते. २०२४ मध्ये मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून ते आपला कौल कुणाच्या पारडयात टाकतात, हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईल.
नागपूर : दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची फाईल पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळलेल्या भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्याला देखील ‘क्लिनचीट’ देण्याच्या हालचालींना वेग आल्याचे कळते.
चंद्रपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरकैदेत आहे. संघ हा समाजात विष पेरण्याचे काम करतो. चंद्रपूरचे रहिवासी असलेल्या संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या घरी जावून विचारले पाहिजे तुम्हाला संविधान मान्य आहे की मनुस्मृती, संघाने स्वातंत्र्यानंतर संघ मुख्यालयावर तिरंगा ध्वज का फडकवला नाही असा प्रश्न करा असे ॲड. असीम सरोदे म्हणाले.
महाराष्ट्र न्यूज टुडे लाइव्ह