Maharashtra Politics Updates : राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यांवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर ओबीसी नेते नाराजी व्यक्त करत आहेत. या निर्णयाविरोधात रिट याचिका दाखल करण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात होता, असा आरोप भुजबळांनी केला आहे. त्यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच राहुल गांधींनी मतचोरीच्या केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता सरकारने ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ई केवायसी करावी लागणार आहे. दरम्यान, मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो रंग फेकण्यात आला त्या प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. तसेच राज्यभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.
Maharashtra News Live Update : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडींचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेऊयात.
किसन कथोरेंना वामन म्हात्रेंच्या शुभेच्छा, समाज माध्यमांवरील शुभेच्छांनी चर्चेला उधाण
“… नाहीतर खुर्ची सोडावी लागेल”, अजित पवारांचा मंत्र्यांना स्पष्ट इशारा; नेमकं काय झालं?
Ajit Pawar Warning to Ministers: राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर नागपूर येथे घेण्यात येत आहे. आज शिबिराच्या पहिल्या दिवशी अध्यक्ष अजित पवार यांनी या शिबिरात आपली भूमिका मांडत असताना पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीतीबाबत भूमिका मांडली. तसेच पक्षातील शिस्तीबाबत पदाधिकारी आणि थेट मंत्र्यानाही खडे बोल सुनावले. जर पक्षाचे आदेश पाळले नाहीत तर खुर्ची सोडावी लागेल, असाही इशारा अजित पवार यांनी दिला.
"एक दिवस वेळेवर यायला सांगितलं तर काहींना त्रास होतो", अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमासाठी वेळेत न येणाऱ्या पदाधिकाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. अजित पवार म्हणाले की, "कधी कधी काही मंत्री जातात आणि तेथील जिल्हाध्यक्षांना विचारत देखील नाही. तो आपल्या परिवारातील घटक आहे. माझ्यासह सर्वांनी ज्या काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त कराव्या लागतील. अन्यथा खुर्ची खाली करावी लागेल. वेळेला महत्व दिलं पाहिजे. अनेकजण उशीरा आले. पण आता पुढच्यावेळी वेळेत आले नाही तर सभागृहाचा दरवाजा बंद केला जाईल. तुम्हाला किती महत्व आहे हे देखील कळूद्या. पक्षाच्या कार्यक्रमाला एक दिवस यायचं असतं तरी काहींना त्रास होतो", असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विदर्भातील जनतेत आंदोलनाचा ‘करंट’, शेतकरी नेते राकेश टिकेत यांचा इशारा
Dighesahebanchi devi: यंदा दिघे साहेबांचा नवरात्रोत्सव असणार खास, दक्षिणेतील बृहदेश्वर मंदिर आणि उत्तरेतील चारधामचे घडणार दर्शन…
OBC Reservation : वाळवा तालुका ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन
ठाण्यात व्यवसाय करणे कठीण? बोगस माथाडींचा सुळसुळाट
गणेश नाईक यांच्या दरबारावरून महायुतीत संघर्ष; शिंदेसेनेची हरकत याचिका
भाजपच्या तीन नेत्यांपुढे कोथरुड ‘शांत’ करण्याचे आव्हान
‘मेडिट्रिना’त पुन्हा १८ कोटींचा गैरव्यवहार, सात वर्षांतली तिसरी फसवणूक
अहिल्यानगर: भाजप कार्यकर्त्यांचा नागरी समस्यांसाठी महापालिका आयुक्तांना घेराव
जखमी पक्ष्यावरील उपचारासाठी 'त्याने' ओलांडली राज्याची सीमा
नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांना ‘सर्वोच्च’ दणका; २० हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे कारवाईच्या फेऱ्यात
कुंभमेळ्याची कामे गुजराती कंत्राटदाराकडे.. महाजन काय म्हणाले?
इचलकरंजीत महायुती स्पर्धा; महाविकास आघाडीची अद्याप चाचपणीच सुरू
शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवास मिरजेत प्रारंभ...
अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे वारे, पैठणीने गाजलेल्या लढतीची आठवण
Video : विषारी नागाने चक्क स्वयंपाकघरात मांडले ठाण, कुटुंबीयांची त्रेधातिरपीट; अखेर 'तो' धाऊन आला मदतीला…
राष्ट्रवादीला सुनेत्रा पवार देणार निवडणूक रणनीतीचे धडे; थोड्याच वेळात चिंतन शिबिरास सुरुवात होणार
"अंतरवाली सराटीतील हल्ल्यामागे पवारांच्या आमदाराचा हात", या आरोपावर भुजबळांचं पुन्हा मोठं भाष्य; म्हणाले, "रात्री २ वाजता..."
अंतरवली सराटीत झालेल्या आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतरवाली सराटीत झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीहल्ला केला होता. या बैठकीत पवार यांचा एक आमदार उपस्थित होता. बैठकीत दगडफेकीचा डाव होता, असा आरोप भुजबळ यांनी केला. या आरोपावर छगन भुजबळांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आहे. भुजबळ म्हणाले की, "मी असं म्हटलं की शरद पवार गटाचे आमदार, अशा शब्द मी वापरलेला आहे. तसेच आम्ही त्यांना घरी देखील बसवलेलं आहे असंही मी बोललो आहे. शरद पवारांना जर आधी सांगितलं असतं की ८४ पोलीस जखमी झाले, तर ते कदाचित अंतरवाली सराटीत तेव्हा गेले नसते. मात्र, एकतर्फी सांगण्यात आलं आणि त्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. शरद पवार त्या ठिकाणी गेले म्हणून उद्धव ठाकरेही गेले. मला तेथील वाळेकर या व्यक्तींनी सांगितलं की रात्री २ वाजता बैठक झाली आणि दगड जमवण्यात आले आणि पोलिसांवर हल्ला झाला", असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
...तरच ‘पैसे’ मिळणार…आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया
लाडकी बहीण योजनेत शासकीय महिला कर्मचारी, पुरुष लाभार्थी तसेच अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी तसेच एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याची बाब समोर आली. यामुळे या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अपात्र महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २ कोटी ५२ लाख लाभार्थींपैकी सुमारे २७ ते २८ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. गरजू महिलांच्या खात्यातच पैसे जमा व्हावेत यासाठी सरकारने आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई केवायसी केल्यानंतरच या महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील महिलांना ई केवायसी करणे बंधनकारक. ई केवायसी केल्यानंतरच महिलांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होणार आहे. (फोटो-संग्रहित छायाचित्र)