Mumbai News Update : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरात उमेदवाऱ्या, युत्या-आघाड्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होत आहेत. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती आहे. यासंदर्भातील राजकीय बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. आज ते श्रीनगरमध्ये जनतेला संबोधित करतील. मोदींच्या या दौऱ्यावरही आपलं लक्ष असेल. दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमधील संदेशखाली प्रकरण आणि दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबतच्या बातम्याच्यां आढावा आपण घेणार आहोत.

BJP state president, chandrashekhar bawankule, Criticizes sharad pawar NCP s Manifesto, Deceptive manifesto, bjp, sharad pawar ncp, lok sabha 2024, election 2024, election campaign, criticise, marathi news,
“शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शपथनामा’ ही जनतेची फसवणूक,” भाजप प्रदेशाध्यक्षांची टीका, म्हणाले…
Sunetra Pawar Wealth vs Supriya Sule Wealth Marathi News
Supriya Sule Wealth : सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांकडून घेतलंय ३५ लाखांचं कर्ज, पार्थ पवारांच्याही ऋणी! निवडणूक प्रतिज्ञापत्रातून संपत्तीचा खुलासा
The seat allocation of the three component parties in Mahavikas Aghadi was finally announced on Tuesday
मविआचे ठरले, युतीत संभ्रम; काँग्रेस, ठाकरे-शरद पवार गटांचे जागावाटप पूर्ण
mahayuti eknath shinde and devendra fadanvis
जागावाटपाचे खडाष्टक सुरूच; भाजपच्या कुरघोडय़ांनी शिंदे गट अस्वस्थ, तर मविआत राऊतांवर काँग्रेस संतप्त
Live Updates

Maharashtra Live News Today 07 March 2024 : राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्या

18:54 (IST) 7 Mar 2024
केदार शिंदे यांचा ‘आईपण भारी देवा’ लवकरच येणार, जागतिक महिला दिनानिमित्ताने घोषणा

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळाचे सूत्र घेऊन स्त्रीच्या भावविश्वात डोकावणाऱ्या ‘बाईपण भारी देवा’ या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाने अतुलनीय यश मिळवले. प्रेक्षकपसंती आणि आर्थिक कमाई दोन्ही बाबतीत वरचढ ठरलेल्या या चित्रपटानंतर केदार शिंदे यांनी त्यांच्या ‘आईपण भारी देवा’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

वाचा सविस्तर...

18:02 (IST) 7 Mar 2024
‘मिस वर्ल्ड स्पर्धे’त झळकणार नागपूरकर डिझायनरचा पोशाख

नागपूर : भारतात यंदा ७१ व्या ‘मिस वर्ल्ड स्पर्धे’चे आयोजन केले जात आहे. मुंबई येथे होणाऱ्या या स्पर्धेत नागपूरकर डिझायनरचा पोशाख झळकणार आहे. शहरातील फॅशन डिझायनर प्रेरणा गुप्ता यांनी मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी विशेष पोशाखाची निर्मिती केली आहे.

सविस्तर वाचा...

17:40 (IST) 7 Mar 2024
बुलढाणा : पैशांचा वाद, मित्रच निघाले मारेकरी

बुलढाणा: नांदुरा येथे करण्यात आलेल्या अज्ञात युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून यातून धक्कादायक कारण बाहेर आले आहे. या युवकाचा त्याच्या तिघा घनिष्ठ मित्रांनी पैशांच्या कारणावरून खून केल्याचे निष्पन्न झाले.

सविस्तर वाचा...

17:01 (IST) 7 Mar 2024
आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा, विराज खटावकर यांनी साकारला सात फूट उंचीचा पुतळा

शिल्पकार खटावकर यांच्या स्टुडिओत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून हा पुत‌ळा आसामकडे रवाना करण्यात आला.

सविस्तर वाचा...

16:49 (IST) 7 Mar 2024
त्र्यंबकेश्वरसाठी महाशिवरात्रीनिमित्त आजपासून जादा बससेवा

बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नाशिक, भगूर, सिन्नर येथून त्र्यंबकेश्वरसाठी जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

16:47 (IST) 7 Mar 2024
नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण : पॅरोलची मुदत संपल्यानंतर कारागृहात हजर न झालेल्या आरोपीला पकडण्यात यश

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर (अभिवचन) बाहेर आलेला शिक्षाबंदी नरेंद्र गिरी कारागृहात परतला नव्हता. अखेर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली. सविस्तर वाचा…

16:46 (IST) 7 Mar 2024
नाशिकमध्ये पुन्हा बिबट्यांची दहशत; वडजाईमाता नगरमध्ये तीन बिबट्यांचे दर्शन

पंचवटीतील मखमलाबादजवळील वडजाईमाता नगरात एकाच वेळी तीन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने घोड्याच्या शिंगरुला मारले होते. सविस्तर वाचा…

16:45 (IST) 7 Mar 2024
डोंबिवलीतील टीडीआर घोटाळ्याच्या अहवालाची पोलिसांकडून तयारी

या घोटाळ्याचा यापूर्वी तपास करणाऱ्या विष्णुनगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.

सविस्तर वाचा...

16:45 (IST) 7 Mar 2024
विक्रोळीत बलात्कार पीडित महिलेची आत्महत्या

लग्नाचे अमिष दाखवून ३४ वर्षीय महिलेवर एका तरुणाने अनेकदा बलात्कार केल्याची घटना विक्रोळीत घडली होती. या प्रकरणातील पीडित महिलेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली असून विक्रोळी पोलिसानी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

सविस्तर वाचा…

16:15 (IST) 7 Mar 2024
नाशिक : कपालेश्वर मंदिराजवळील रस्त्यांवर वाहतूक बंद

शहरात गोदाकाठावरील कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त होणारी गर्दी पाहता वाहतूक शाखेच्या वतीने मंदिर परिसराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 7 Mar 2024
गांधी-विनोबा भावेंच्या जिल्ह्यात दारूबंदी, तरीही विक्री जोमात; गावकरी आणि पोलिसांनी काढली दारूविक्रेत्याची वरात…

वर्धा : गाव करी ते राव न करी, असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार गावात आला. गांधी, विनोबा भावेंच्या जिल्ह्यात दारूबंदी असली तरी येथे दारूचा महापूर वाहू लागल्याने गावकरी त्रस्त झाले होते. त्या अनुषंगाने मग ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. विषारी दारू पिल्याने गावात गेल्या पाच महिन्यांत चार युवकांचा बळी गेल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

सविस्तर वाचा...

16:11 (IST) 7 Mar 2024
विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्गठनासाठी अंतिम संधी, केंद्राला चार आठवड्यांचा वेळ…

नागपूर : विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या मुदतवाढीसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. परंतु, याबाबत अधिसूचना काढण्याचा अधिकार केंद्र शासनाच्या गृहविभागाला आहे. राज्य शासनाने तसेच राज्यपालांनी याबाबत वारंवार केंद्राशी पत्रव्यवहार केला. मात्र केंद्राने काहीच प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती राज्य शासनाने उच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने केंद्राला अंतिम संधी देत चार आठवड्यात निर्णयाबाबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले.

सविस्तर वाचा...

15:16 (IST) 7 Mar 2024
राज्यातील शासकीय विद्यापीठांच्या आर्थिक स्थितीचा पहिल्यांदाच अभ्यास

राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सुमारे चौदा हजार कोटी रुपयांचे वार्षिक अंदाजपत्रक आहे. त्यातील जवळपास १३ हजार कोटी रुपये वेतन आणि पेन्शन यावर खर्च होतात.

सविस्तर वाचा...

15:11 (IST) 7 Mar 2024
पिंपरी : मंगळसूत्र चोरणाऱ्या सख्या भावासह दागिने खरेदी करणारा अटकेत

भोसरी परिसरातून महिलांच्या गळ्यातील  मंगळसूत्र हिसकावणाऱ्या दोन सख्या भावांना आणि चोरीचे दागिने विकत घेणा-याला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून आठ तोळे सोने, दुचाकी असा चार लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. सविस्तर वाचा…

15:09 (IST) 7 Mar 2024
एप्रिलपासून मुंबईत शून्य औषध चिठ्ठी योजना; मुंबईकरांना मिळणार मोफत वैद्यकीय उपचार, मुख्यमंत्री यांची आपला दवाखान्याला अचानक भेट

मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच एप्रिलपासून शून्य औषध चिठ्ठी योजनेची अमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सविस्तर वाचा…

15:08 (IST) 7 Mar 2024
नागपुरातील दिघोरी उड्डानपुलाला वाहतूक कोंडीचे ग्रहण; सुसाट जड वाहनांमुळे चौकात…

शहरातील रस्त्यावरील वाहतुकीचा भार कमी व्हावा आणि वाहतूक कोंडी टळावी यासाठी उड्डानपुलाची निर्मिती केल्या जाते. मात्र, उड्डानपुलाच्या चढ आणि उतार अशा दोन्ही बाजुंना वाहतूक कोंडीची नवीन समस्या उद्भवल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

सविस्तर वाचा…

15:08 (IST) 7 Mar 2024
वसंतामध्ये आसमंतात मनमोहक घडामोडींचा बहर; ग्रहांची युती व अवकाश केंद्राच्या दर्शनाची पर्वणी

वसंत ॠतूतील मनमोहक बदल व विविध प्रकारच्या सण, उत्सवातून मिळणाऱ्या आनंद, उत्साहात या वेळी आकाशही सहभागी होणार आहे. वसंतात आसमंतातही मनमोहक घडामोडींचा बहर होणार असून ग्रहांची युती व अवकाश केंद्राच्या दर्शनाची पर्वणी आकाशप्रेमींना लाभणार आहे, सविस्तर वाचा…

15:07 (IST) 7 Mar 2024
अखेर दोन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर प्रा. साईबाबा कारागृहाबाहेर; पत्नी, भाऊ आणि मित्रासह साईबाबा घराकडे रवाना

नक्षली चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी.एन. साईबाबा व त्याच्या साथीदारांची आजन्म कारावासासह इतर शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली व सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.

सविस्तर वाचा…

14:44 (IST) 7 Mar 2024
“आता बास झालं, तुला नक्की पाडणार”; मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी, पुणे भाजपामधील वाद चव्हाट्यावर

शहर हे पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असून मागील काही वर्षांत निवडणुकीच्या काळात अनेक वेळा फ्लेक्सबाजीमधून नेत्यांना सुनावल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

सविस्तर वाचा...

14:28 (IST) 7 Mar 2024
जळगाव : जुन्या तारखेवर स्वाक्षरी करण्यासाठी नऊ हजार रुपये मागणाऱ्या लिपिकाला अटक

भुसावळ येथील तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) भाडेतत्त्वावर वाहने लावली आहेत.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 7 Mar 2024
नाशिक : महाआरतीसाठी गोदापात्रालगत बांधकामास विरोध

आरतीचा अधिकार कुणाचा यावरून संघर्ष सुरू असून दोन्ही संघटनांकडून समांतरपणे गोदाआरती केली जात आहे.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 7 Mar 2024
नाशिकमध्ये राज ठाकरे ‘भावी मुख्यमंत्री’ फलक, राजकीय पक्षांची फलकबाजी

मनसेच्या १८ व्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने पक्षाने अध्यक्ष राज ठाकरे यांचा ‘भावी मुख्यमंत्री‘ म्हणून उल्लेख करत राज्याच्या राजकारणात पुन्हा आपली पकड मजबूत करण्याची धडपड चालवली आहे.

सविस्तर वाचा...

13:47 (IST) 7 Mar 2024
खासदार भावना गवळी यांचे तिकीट कटणार? महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे की राजू पाटील राजे!

वाशिम : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटातील विद्यमान खासदार भावना गवळी व पालकमंत्री संजय राठोड यांच्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

सविस्तर वाचा...

13:29 (IST) 7 Mar 2024
मुंबई : डी. एन. नगरमधील अष्टविनायक गृहप्रकल्पाचा मार्ग मोकळा, १९ वर्षांपासून सुरू होता पुनर्विकास

अंधेरी पश्चिमेतील डी. एन. नगर अष्टविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या गेल्या १९ वर्षांपासून सुरू असलेल्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मोकळा झाला आहे.

सविस्तर वाचा...

13:14 (IST) 7 Mar 2024
“ज्या व्यक्तीचा मावळ मतदारसंघात थांगपत्ता नाही”; बारणेंच्या टीकेवर वाघेरे म्हणाले, “पक्ष बदलणाऱ्यांनी…”

मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 7 Mar 2024
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा लाभ! राष्ट्रवादी काँग्रेसकडून बुलढाणा मतदारसंघाचा आढावा; राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात…

बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट व भाजपात चांगलीच जुंपली असताना आणि जागावाटप व उमेदवारीचा गुंता कायम असतानाच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा सविस्तर आढावा घेतला. यामुळे माजीमंत्री राजेंद्र शिंगणे तिसऱ्यांदा मैदानात उतरतात काय, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा...

12:44 (IST) 7 Mar 2024
“भाजपमध्ये कोण जाणार, एकदाचा सोक्षमोक्ष लावा,” काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

चंद्रपूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणतात, आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार, तर आमदार धानोरकर सांगतात, वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला आज दोन्ही नेते हजर आहेत. त्यामुळे कोण कुठे जाणार, हे दोघांनाही विचारून घ्या व एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका. उगाच संभ्रम निर्माण करू नका, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी केली.

सविस्तर वाचा...

12:43 (IST) 7 Mar 2024
नागपुरात हजारो कोंबड्यांना ‘बर्ड फ्लू’! साडेआठ हजार कोंबड्या मारण्याचे आदेश

नागपूर : उपराजधानीतील राज्य शासनाच्या प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात हजारो कोंबड्यांना बर्ड फ्लूचे संक्रमण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. येथील व जवळपासच्या सुमारे साडेआठ हजार कोंबड्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 7 Mar 2024
यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध

यवतमाळ – जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हमरीतुमरीवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापासून या दोन्ही नेत्यांत सुरू झालेले शीतयुद्ध आता थेट रस्त्यावर पोहोचले आहे.

सविस्तर वाचा...

12:34 (IST) 7 Mar 2024
फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचे प्रकरण: शरद पवार गटाचे योगेश सावंत यांच्या पोलीस कोठडीचे आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द

आपली बाजू न ऐकताच सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याचा दावा करून सावंत यांनी पत्नी आदिती यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 7 Mar 2024
मुंबई : डीआरआयचे झवेरी, वर्सोवा येथे छापे; दुबई सोने तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक

दुबईतून सोन्याची तस्करी करून भारतात विकणाऱ्या टोळीच्या पाच सदस्यांना अटक करण्यात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला (डीआरआय) यश आले आहे.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 7 Mar 2024
पुणे : तीन हजार रुपयांची लाच घेताना ‘जीएसटी’ कार्यालयातील महिला अधिकारी अटकेत

वस्तू आणि सेवा कार्यालयातील (जीएसटी) राज्यकर अधिकारी महिलेस तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

सविस्तर वाचा...

11:52 (IST) 7 Mar 2024
ठाणेकरांनो… कोंडी टाळण्यासाठी शहरात मोठे वाहतूक बदल! बाहेर पडण्याआधीच जाणून घ्या…

ठाण्यातील कौपिनेश्वर या पुरातन मंदिरात तसेच ढोकाळी येथील नंदीबाबा मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी होत असते.

सविस्तर वाचा...

11:51 (IST) 7 Mar 2024
मुंबई : कर्जत, कसारा, बदलापूरातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या कायम उशिरा का असतात? प्रवाशांचा संतप्त सवाल

उशीराने धावणाऱ्या या रेल्वेगाड्यांमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नसल्याने कार्यालयीन कामकाजावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे.

सविस्तर वाचा...

11:50 (IST) 7 Mar 2024
शेकापच्या प्रशांत नाईक यांना शिवसेनेची खुली ऑफर, उदय सामंत म्हणाले, “आता राजकारणातही महेंद्र दळवींसोबत…”

खिलाडूवृत्ती दाखवत पुढे जायला हवे असा खोचक टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 7 Mar 2024
VIDEO: कासवांची पिल्ले समुद्रात सुखरूप सोडली, हरिहरेश्वर येथील ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाला यश

दरवर्षी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला जातो. अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो.

सविस्तर वाचा...

11:07 (IST) 7 Mar 2024
लोणावळ्यात शरद पवारांवर जेसीबीद्वारे फुलांची उधळण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. पवार येथे कार्यकर्ता मेळाव्यात सहभागी होणार आहेत. लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने शरद पवारांना हार घालण्यात आला. तसेच जेसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटाचे लोणावळ्यातील १३७ कार्यकर्ते आणि पदाधिकारी शरद पवारांकडे परतणार असल्याचा दावा शरद पवार गटाने केला आहे.

10:36 (IST) 7 Mar 2024
“…तो हट्ट सोडला पाहिजे”, राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला; जागावाटपाबाबत म्हणाले…

महाविकास आघाडीची बुधवारी (६ मार्च) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, आजच्या बैठकीत मनासारखी चर्चा झाली नाही. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत म्हणाले, युतीत किंवा आघाडीत सर्वांच्या मनाप्रमाणे निर्णय होत नाहीत. आम्ही यापूर्वी शिवसेना भाजपा युतीत होतो. तेव्हाही आमच्या मनाप्रमाणे होत नव्हतं. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आताही तशा गोष्टी होतात. आघाडी धर्म टिकवण्यासाठी प्रत्येकाने सगळं काही आपल्याच मनाप्रमाणे व्हावं हा हट्ट सोडला पाहिजे.

satej patil on cm eknath shinde

“प्रसिद्धीसाठी शिंदे सरकारची दिवसाला २.८० कोटींची उधळपट्टी”, काँग्रेसचा आरोप

महाराष्ट्रात एकीकडे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नाही. आशा सेविका तुटपुंज्या मानधनासाठी संपावर जात आहेत. पण सरकार मात्र प्रसिद्धीला हपापले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य सतेज पाटील यांनी एकनाथ शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. यासाठी पुराव्यादाखल सतेज पाटील यांनी ४ मार्च रोजी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेची प्रतच सोबत जोडली आहे. आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये सतेज पाटील यांनी यासंदर्भातली आकडेवारी दिली आहे. “महाराष्ट्र शासनाने लोकसभेच्या प्रचाराच्या हेतूने एका महिन्याच्या प्रसिद्धीसाठी ‘विशेष माध्यम आराखडा’ मंजूर केला आहे. यामध्ये ३० दिवसांसाठी तब्बल ८४ कोटी रुपये म्हणजेच दिवसाला २ कोटी ८० लाख रुपये माध्यमांतील प्रसिद्धीवर उधळले जाणार आहेत”, अशी पोस्ट सतेज पाटील यांनी केली आहे. सतेज पाटील यांनी सविस्तर आकडेवारी दिली आहे. “या खर्चाची आकडेवारी पुढीलप्रमाणे विभागलेली आहे: वर्तमानपत्रे – २० कोटी रुपये, वृत्तवाहिन्या – २० कोटी ८० लाख रुपये, डिजिटल होर्डिंग-एलईडी – ३७ कोटी ५५ लाख रुपये, सोशल मीडिया – ५ कोटी रुपये”, असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.