Maharashtra News Highlights: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अशा स्थितीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (२६ सप्टेंबर) दिल्ली दरबारी दाखल झाले आहेत. तसेच काल त्यांनी मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मदतीसंदर्भात निवेदन दिलं आहे. महापुराने बेहाल झालेल्या मराठवाड्याला मदतीचा हात देणं गरजेचं असून राज्य सरकारच्या तिजोरीत निधी नसला तरी उणे अर्थसंकल्पातून तरतुदी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर मदत दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

Live Updates

Marathi News Live Today : राज्यासह देशभरातील बातम्या वाचा एकाच क्लिकवर.

23:10 (IST) 26 Sep 2025

दक्षिण मुंबईतील सुशोभीकरण कामांची चौकशी होणार? दक्षता विभागाचे आदेश

माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी या प्रकरणी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
22:00 (IST) 26 Sep 2025

चंद्रपूर : तहसीलदारांच्या निष्क्रीयतेला कंटाळून शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय, तहसील कार्यालयातच विष प्राशन

मेश्राम यांची कुरोडा गावातील सर्वे क्रमांक ८७ वरील शेती ही त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. ...वाचा सविस्तर
21:46 (IST) 26 Sep 2025

कृष्णा कारखान्याच्या कामगारांसाठी नवीन योजना - डॉ. सुरेश भोसले

जुन्या कृष्णा साखर कारखान्याचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्यात आल्याने कारखान्याची गाळप क्षमता वाढली, त्यातून मोठी आर्थिक बचत झाली आहे. ...सविस्तर वाचा
21:21 (IST) 26 Sep 2025

साताऱ्यात उपवास भाजणीतून ३५ जणांना विषबाधा; वडूजसह परिसरातील घटना, उपचार सुरू

सध्या नवरात्र उत्सव सुरू असून, अनेक ठिकाणी त्यानिमित्त उपवास केले जात आहेत. उपवासाच्या वेगवेगळ्या पद्धती व खाद्यपदार्थ अंगीकारले जात आहेत. ...सविस्तर बातमी
21:09 (IST) 26 Sep 2025

पूरबाधित नागरिकांचे जनजीवन सुरळीत करा - जयकुमार गोरे

सोलापूर येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात अतिवृष्टी व पूर परिस्थितीच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. ...अधिक वाचा
20:52 (IST) 26 Sep 2025

मराठी चित्रपटाचे चित्रीकरणावरून परतणारा ट्रक नदी जवळ उलटला… आठ जखमींना तातडीने…

‘गोष्ट सुरू होती’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे कामगार आलापल्ली येथे गेले होते. ...वाचा सविस्तर
20:48 (IST) 26 Sep 2025

कोल्हापुरातील शाही दसरा महोत्सवात सात राज्यांची लोककला

राजस्थानी कलाकारांच्या पारंपरिक चरी नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ...सविस्तर वाचा
20:37 (IST) 26 Sep 2025

"माझ्या हत्येचा कट रचणाऱ्या 'त्या' गुन्हेगारांवर कुणाचा वरदहस्त?", आमदार सुनील शेळकेंचा संतप्त सवाल

आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट काही महिन्यांपूर्वी पिंपरी- चिंचवड पोलिसांनी उधळून लावला. ...अधिक वाचा
20:14 (IST) 26 Sep 2025

दादरमधील वनिता समाज येथे भव्य ग्राहक पेठ, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानतर्फे आयोजन

या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी निर्मात्या अमृता राव यांच्या हस्ते पार पडले. ...वाचा सविस्तर
20:06 (IST) 26 Sep 2025

पेटची मुदत संपत आली तरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक मिळेना, मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागामधून पीएचडी करण्यासाठी पेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. ...वाचा सविस्तर
18:58 (IST) 26 Sep 2025

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाहीत, आता किमान…", चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जी मागणी करतील, ती ऐकून घेणे ही आमची जबाबदारी आहे. ...सविस्तर वाचा
18:33 (IST) 26 Sep 2025

संसर्गजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी विशेष कृती दल - मुख्यमंत्री फडणवीस

एम्बेड प्रकल्पास गडचिरोली जिल्ह्यात लक्षणीय यश... ...वाचा सविस्तर
18:32 (IST) 26 Sep 2025

'आम्ही पोलिसांना टीप देतो, तू असे लोकांना का सांगतो' म्हणत कोयत्याने वार

या प्रकरणी राहुल आप्पासाहेब लोहार (२७, उरुळी कांचन), आकाश दिनकर गायकवाड (२४, मोशी), ऋतिक प्रकाश गायकवाड (२४, चाकण), गणेश बबन वहिले (२३, डुडूळगाव) यांना अटक केली असून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
18:24 (IST) 26 Sep 2025

"मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाणमालकाची जास्त काळजी"; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "दिल्लीतच थांबा…"

काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ...सविस्तर वाचा
18:18 (IST) 26 Sep 2025

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची दहा लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांनी गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ...अधिक वाचा
18:18 (IST) 26 Sep 2025

अपघातात अपंगत्व आलेल्या दुचाकीस्वाराला एक कोटीची नुकसानभरपाई

अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारांसाठी १६ लाख रुपये खर्च झाला होता. ...अधिक वाचा
18:03 (IST) 26 Sep 2025

उंड्रीत १४ मजली इमारतीत आग; सिलिंडरच्या स्फोटात मुलाचा मृत्यू; स्फोटात दोन जवानांसह पाच जण जखमी

कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या उंड्री भागात मार्वल आयडियल सोसायटी ही चौदा मजली इमारत आहे. इमारतीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास आग लागली. ...सविस्तर बातमी
18:03 (IST) 26 Sep 2025

ट्रम्प यांचा भारतीय शेअर बाजाराला पुन्हा झटका; या कंपन्यांच्या शेअरला सर्वाधिक झळ

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ७३३.२२ अंशांची घसरण झाली आणि तो ८०,४२६.४६ या तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर स्थिरावला. ...अधिक वाचा
17:31 (IST) 26 Sep 2025

Maharshtra Sahitya Parishad: दशकभराने ‘मसाप’ची निवडणूक; आज होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणा

प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली २०१६ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची कार्यकारिणी अस्तित्वात आली होती. परिषदेच्या घटनेनुसार पाच वर्षांच्या मुदतीनंतर निवडणूक घेणे अपेक्षित होते. ...अधिक वाचा
17:31 (IST) 26 Sep 2025

आदिशक्ती रुद्रायणी देवीचे प्रभू श्रीराम, सीता मातेने घेतले होते दर्शन; चौदावे जागृत शक्तिपीठ, अयोध्येसोबत…

निसर्गरम्य वातावरणातील उंच टेकडीवर वसलेल्या रुद्रायणी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सवाची मोठी परंपरा आहे. ...अधिक वाचा
17:25 (IST) 26 Sep 2025

Amravati Crime News: वडिलांना शिवीगाळ केल्याचा राग मनात ठेवून तरुणाने केली हत्या, पोलिसांनी केली अटक

तहसील कार्यालयात नक्कल विभागात कार्यरत असलेले राजेश इंगळे (वय ५४, रा. सैनिक कॉलनी, दर्यापूर) यांचा २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री खून करण्यात आला. ...अधिक वाचा
17:08 (IST) 26 Sep 2025

आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई मुख्य अतिथी, निमंत्रण पत्रिका येताच…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक अशा विजयादशमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. नागपूरमध्ये २ ऑक्टोबरला संघाच्या विजयादशमी सोहळा साजरा होणार आहे. ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 26 Sep 2025

MPSC Exam 2025 Postponed: एमपीएससीचा मोठा निर्णय… संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर; नवी तारीख ‘ही’

‘एमपीएससी’ने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परीक्षेच्या जाहिरातीनुसार, परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. ...वाचा सविस्तर
16:51 (IST) 26 Sep 2025

MPSC Exam Date: एमपीएससीची २८ सप्टेंबरची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली, ९ नोव्हेंबरला होणार परीक्षा, राज्य सरकारच्या पत्रानंतर…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ पासून अभ्यासक्रमात बदल केला आहे. यानंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा पहिल्यांदाच २८ सप्टेंबरला होणारा आहे. ...अधिक वाचा
16:36 (IST) 26 Sep 2025

बुलढाणा : ठाकरे सेनेचा 'डीपीसी' बैठकीत घुसण्याचा प्रयत्न, पोलिसांनी रोखले

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवारी, २६ सप्टेंबर रोजी दुपारी पालकमंत्री मकरंद आबा पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली . ...सविस्तर बातमी
16:27 (IST) 26 Sep 2025

नवी मुंबई विमानतळाचं नाव ठरलं! केंद्र सकारचं अनुकूलता, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर फडणवीसांची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते म्हणाले, "नवी मुंबईत विमानतळ व मेट्रो ३ चं उद्घाटन लवकरच केलं जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्धाटन पार पडेल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी. बा. पाटील यांचं नाव दिलं गेलं पाहिजे असं आमचं मत आहे. आम्ही त्यासंदर्भात केंद्र सरकारला प्रस्ताव दिला आहे. या नावाला केंद्र सरकारची अनुकूलता आहे. त्यासंदर्भात प्रक्रिया चालू आहे. केंद्र सरकार आणि आम्ही या विमानतळाला दी. बा. पाटलांचंच नाव देऊ."

16:27 (IST) 26 Sep 2025

खोट्या माहितीवर कंत्राट हडपले, जिल्हा परिषद चौकशीत उघड म्हणून आमदार म्हणतात…

जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशीर्ष अंतर्गत ग्रामीण रस्ते विकासाकरिता २०२४ - २५ मध्ये निधी उपलब्ध झाला होता. ...सविस्तर वाचा
16:25 (IST) 26 Sep 2025

गुंड टिपू पठाण याच्या बेकायदा बांधकामावर कारवाईचा बडगा; पोलिस, महापालिकेने बेकायदा बांधकाम पाडले

हडपसरमधील सय्यदनगर परिसरात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...वाचा सविस्तर
16:21 (IST) 26 Sep 2025

Pune Crime News: नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत देवीच्या मूर्तीवरील १० लाखांचा सुवर्णहार लंपास; सुखसागरमघील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सुखसागरनगर भागातील एका बंगल्यात राहायला आहेत. नवरात्रोत्सवात घरातील देवीच्या मूर्तीस सोन्याचा राणीहार परिधान करण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
16:12 (IST) 26 Sep 2025

पेंच व्याघ्रप्रकल्पाला पावसाचा फटका, पर्यटनाचा मुहूर्त लांबला

दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक या व्याघ्रप्रकल्पात येतात. व्याघ्रदर्शन झाले नाही तरीही पेंचचे जंगल अतिशय सम़द्ध आहे. ...अधिक वाचा