Today’s News Update, 05 January 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी होते असं विधान केल्यानंतर त्यावरून राजकारण तापलं आहे. दुसरीकडे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापू लागला आहे. राहुल नार्वेकरांसमोर झालेल्या सुनावणीनंतर आता आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर येत्या १० तारखेला अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमवीर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Live Updates

Maharashtra News Updates in Marathi: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

18:26 (IST) 5 Jan 2024
काय सांगता? शिपाई संवर्गातील १० कर्मचारी तासाभरात झाले लिपीक!

यवतमाळ: शासकीय कार्यालयातील विभागांतर्गत पदोन्नती आदी प्रक्रिया ही अत्यंत किचकट समजली जाते. त्यामुळे शासकीय नोकरीत लागल्यानंतर पदोन्नती वगैरे होत राहील, अशा मानसिकतेत कर्मचारी काम करतात.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 5 Jan 2024
विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात बनवली ७ हजार किलोची खिचडी; मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून विश्वविक्रम!

चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी चंद्रपुरात आज सात हजार किलोपेक्षा जास्त तृणधान्यांची खिचडी बनवून विश्वविक्रम नोंदविला.

सविस्तर वाचा...

16:47 (IST) 5 Jan 2024
केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पाचव्यांदा बुलढाण्यात; शिंदे गट अस्वस्थ; राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याचा आढावा

बुलढाणा: मिशन -४५ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची विशेष जवाबदारी असलेले केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव पाचव्यांदा मतदारसंघात येत आहेत. या मुक्कामी दौऱ्यात ते राष्ट्रवादी (अजित पवार) चा बालेकिल्ला असलेल्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचा अप्रत्यक्षपणे धांडोळा घेणार आहेत.

सविस्तर वाचा...

16:36 (IST) 5 Jan 2024
एमएमआरडीएत पाच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची विशेष कार्य अधिकारीपदी वर्णी, महिन्याला वेतनापोटी १२ लाखांची उधळपट्टी

या पाच सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी महिन्याला १२ लाख रुपये खर्च केले जात आहेत.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 5 Jan 2024
कायद्याचा बडगा अन् यादवकालीन पाषाणमूर्ती अखेर पुरातत्व खात्याकडे

वर्धा: केळझर येथे बुध्द विहार परिसरात आढळून आलेली १३ व्या शतकातील यादवकालीन वृषभनाथ महाराजांची कोरीव मूर्ती केंद्रीय पुरातत्व विभागाकडून सोपविण्याचा निर्णय सा घेण्यात आला. बुद्ध विहारच्या मालकीच्या शेतात ही मूर्ती आढळून आली होती.

सविस्तर वाचा...

16:18 (IST) 5 Jan 2024
डोंबिवली : ठाकुर्लीत झाडावर ज्वलनशील रसायनाचा वापर करून जिवंत झाड जाळले

या झाडाचा वाहनांना किंवा परिसरातील सोसायट्यांना अडथळा येत असावा म्हणून या झाडाला मारले असावे, असा संशय पगारे यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा...

15:58 (IST) 5 Jan 2024
लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार

नागपूर: प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. जुबेर रफीक शेख (२५) रा. खरबी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

15:54 (IST) 5 Jan 2024
कोल्हापूर : जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर मुरलीधर जाधवांना अश्रू अनावर; सुषमा अंधारे अन् ‘या’ नेत्यावर केला आरोप

सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी राजकिय डावपेच रचले. त्याचा परिणाम म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले ,असा आरोप मावळते अध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी पत्रकार परिषद केला. सविस्तर वाचा…

15:51 (IST) 5 Jan 2024
नाशिक जिल्हा बँकेच्या मतदारांना आपलेसे करण्याची अजित पवारांची रणनीती

कधीकाळी देशात नावाजलेली, पण मागील काही वर्षात वाढती थकबाकी, तोट्यामुळे अडचणीत आलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पुनरुज्जीवन करताना लाखो शेतकरी मतदारांना आपलेसे करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सविस्तर वाचा…

15:49 (IST) 5 Jan 2024
बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये वाद; अमरावतीत सत्‍तारूढ आघाडीतील मित्र पक्षांमध्येच सुंदोपसुंदी!

अमरावती : प्रभावक्षेत्र वाढावे या रस्‍सीखेचातून आमदार बच्‍चू कडूंचा प्रहार जनशक्‍ती आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्‍वाभिमान या दोन सत्‍तारूढ आघाडीतील घटक पक्षांमध्‍ये सुंदोपसुंदी निर्माण झाली आहे. सविस्तर वाचा…

15:44 (IST) 5 Jan 2024
Maharashtra news live today: जितेंद्र आव्हाडांची रोहित पवारांच्या समर्थनार्थ पोस्ट...

रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर ED ची धाड पडल्याची बातमी समजली. शरद पवारांच्या सोबत निष्ठेने आणि ताकदीने उभे राहण्याचं हे फळ आहे. वाईट याचंच वाटतं की, यात आपलेच 'घरभेदी' सहकारी सामील आहेत. परंतु मला विश्वास आहे की रोहित या सर्व दबावतंत्राला बळी तर पडणारच नाही, उलट अजून ताऊन सुलाखून बाहेर पडेल - जितेंद्र आव्हाड</p>

https://twitter.com/Awhadspeaks/status/1743193538878492996

15:27 (IST) 5 Jan 2024
रायगड जिल्‍ह्यात ८० हजारांच्‍यावर कुणबी नोंदी, अभिलेख तपासणीसाठी भाषातज्ञांची मदत घेणार

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पातळी आणि तालका पातळीवर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 5 Jan 2024
राज्यातील आशा स्वंयसेविका आणि गटप्रवर्तक १२ जानेवारीपासून पुकारणार राज्यव्यापी बेमुदत संप

राज्य सरकारने आशा स्वंयसेविकांच्या मोबदल्यात सात हजार, तर गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात ६२०० रुपयांनी वाढ करण्याचे आश्वासन नोव्हेंबरमध्ये दिले होते.

सविस्तर वाचा...

15:03 (IST) 5 Jan 2024
निवारागृहातील विशेष मुलांच्या छळवणुकीचा आरोप निराधार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली.

सविस्तर वाचा...

14:52 (IST) 5 Jan 2024
मौजमजेसाठी चोरी! अल्‍पवयीन मुलांकडून अकरा दुचाकी जप्‍त

अमरावती: शहराच्‍या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या पाच अल्‍पवयीन मुलांना गाडगेनगर पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे.

सविस्तर वाचा...

14:50 (IST) 5 Jan 2024
मुंबई : अमलीपदार्थांशी संबंधित २२२ खटले विशेष न्यायालयासमोर प्रलंबित

विशेष न्यायालयांसमोर सद्यस्थितीला २२२ खटले प्रलंबित असल्याच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दाखल केलेल्या अहवालाची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.

सविस्तर वाचा...

14:25 (IST) 5 Jan 2024
दक्षिण मुंबईतील ‘या’ मोक्याच्या ठिकाणी पुढील काही दिवस नि:शुल्क पार्किंग करता येणार…

वाहनांच्या पार्किंगसाठी पालिकेने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारले जात असल्यामुळे ‘ए’ विभागाने हे वाहनतळ चालवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस बजावली.

सविस्तर वाचा...

14:16 (IST) 5 Jan 2024
हातातून कबुतर निसटल्याचे कारण झाले अन् रागाच्या भरात गळा आवळला…

अकोला: जिल्ह्यातील पिंजर येथील शेख अफ्फान शेख अय्युब बागवान (७) याची त्याच्या १७ वर्षीय चुलत भावानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

सविस्तर वाचा...

14:14 (IST) 5 Jan 2024
रायगडमध्ये जलजीवन मिशनच्या कामाची संथगती, १ हजार ११२ गावे अद्याप पाण्याच्या प्रतिक्षेत

डिसेंबर अखेरपर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, १ हजार ४२२ मंजूर योजनांपैकी केवळ ३१० कामेच पूर्ण झाली आहेत.

सविस्तर वाचा...

14:02 (IST) 5 Jan 2024
चक्क महिलांनीच केला महिला शिपयाचा विनयभंग; काय आहे प्रकरण जाणून घ्या…

वर्धा: मालमत्तेच्या वादातून काय घडेल याचा नेम नसल्याचे म्हटले जाते. ही घटना तर थक्क करणारी आहे. एका महिला पोलीस शिपायाची स्थानिक गजानन नगरात राहणाऱ्या शुभांगी देशमुख सोबत ओळख होती.

सविस्तर वाचा...

14:01 (IST) 5 Jan 2024
धक्कादायक! नवा कोरा पूल रात्रीतून वाकला…

वाशिम: प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात येत असलेल्या नागठाणा (पाच मैल) ते जुमडा या रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर सध्या पुलाचे काम सुरु आहे. परंतु नवा कोरा पूल रात्रीतून वाकला.

सविस्तर वाचा...

14:00 (IST) 5 Jan 2024
मुंबई पालिकेच्या मालमत्ता करातील उत्पन्नात घट? देयके रखडल्याने फटका, कर भरण्याची ३१ मार्चची मुदत हुकणार

श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेला मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न यंदा घटणार आहे.

सविस्तर वाचा...

13:46 (IST) 5 Jan 2024
मध्यान्ह भोजनाचे स्वयंपाकघर सुरू; दीपक केसरकर यांच्या हस्ते नवीन इमारतीचे उद्घाटन

पनवेल : पनवेल तालुक्यातील ७० शाळांमधील २० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरविण्याची क्षमता असलेल्या अक्षयपात्र फाऊंडेशनने राज्यातील चौथे आणि देशातील ६८ वे सामायिक स्वयंपाकघर पनवेल शहरामधील साईनगर येथे सुरू केले आहे. या स्वयंपाकघराचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

या वेळी केसरकर यांनी अक्षयपात्र फाऊंडेशन आणि या संस्थेला मदत करणाऱ्या प्रत्येक घटकाचे कौतुक केले. या वेळी ‘अक्षयपात्र’च्या अध्यक्षा अमितासना दासा या उपस्थित होत्या.

अक्षयपात्र फाऊंडेशनने करोना साथीनंतर पनवेल महापालिकेकडे स्वयंपाकघरासाठी जागेची मागणी केली होती. महापालिकेने त्यानुसार २ हजार चौरस मीटरचा भूखंड शहरातील साईनगर येथे दिल्यावर येथे एकमजली स्वयंपाकघर उभारण्यात आले. यासाठी ८ कोटी रुपये खर्च आला आहे.

स्वयंपाकघरातून एका वेळेस २० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची क्षमता आहे. सध्या अक्षयपात्र फाऊंडेशन १० हजार विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पुरवते.

13:19 (IST) 5 Jan 2024
म्हाडाच्या बृहतसूची सोडतीत गैरप्रकार, बनावट कागदपत्रे सादर केल्याचा ठपका असलेला अर्जदार बृहतसूचीवरील घरासाठी विजेता

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून नुकत्याच काढण्यात आलेल्या बृहतसूचीवरील घरांसाठीच्या सोडतीत गैरप्रकार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे.

सविस्तर वाचा...

13:09 (IST) 5 Jan 2024
पोलिसाच्या कानशिलात लगावली, पुण्यातील भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचा प्रताप, वाचा नक्की काय झालं ते…

कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या कोनशिलेवर भाजपचे आमदार सुनील कांबळे यांचं नाव नसल्याने ते नाराज होते.

सविस्तर वाचा...

12:56 (IST) 5 Jan 2024
श्रीमंत निवृत्तीसाठी गुंतवणूक पर्यायांच्या निवडीबाबत उद्या मार्गदर्शन; ‘लोकसत्ता अर्थभान’मधून मिळणार महत्त्वाची माहिती

नागपूर: भांडवली बाजारातील धडकी भरवणारे चढ-उतार, सोने आणि गृहनिर्माण क्षेत्रातील मंदावलेले भाव आणि बँकांचे खाली-वर जाणारे व्याजदर, यामुळे म्युच्युअल फंडाकडे सुरक्षितता व स्थिरता म्हणून गुंतवणूकदारांचे आकर्षण वाढले आहे.

सविस्तर वाचा...

12:51 (IST) 5 Jan 2024
Maharashtra news live today: छगन भुजबळांचा पवारांना टोला!

अतीशहाणा त्याचा बैल रिकामा अशी एक म्हण मी ऐकलीये. मला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांचा जो उरला-सुरला गट आहे, तो संपवण्यासाठी इतर पक्षांनी आता काही करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. त्यांचे तथाकथित नेते तो पक्ष संपवण्यासाठी पुरेसे आहेत - छगन भुजबळांंचं जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावरून शरद पवारांवर टीकास्र!

12:45 (IST) 5 Jan 2024
थकबाकी वसुलीसाठी आता ‘दामिनी’चा ‘वार’; सात हजारावर वीज ग्राहक रडारवर

अकोला: सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून थकबाकीदार असलेल्या जिल्ह्यातील सात हजार ६८८ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती केली आहे.

सविस्तर वाचा...

12:33 (IST) 5 Jan 2024
Maharashtra news live today: छगन भुजबळांचा शरद पवारांना टोला!

अजित पवारांनीच सांगितलंय की शरद पवारांनी आशीर्वाद द्यावा. त्यामुळे ते बरोबर आहे. शरद पवारांनी जर आशीर्वाद दिले, तर सोन्याहून पिवळं आहे - छगन भुजबळ

12:10 (IST) 5 Jan 2024
गडचिरोली: वनपरिक्षेत्र अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात; ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी मागितले १० लाख

गडचिरोली: रस्ते बांधकामावरील पकडलेल्या वाहनांवर ठोठावलेला ७२ लाखांचा दंड कमी करण्यासाठी १० लाखांची लाच मागणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

सविस्तर वाचा...

Mumbai Maharashtra Live News in Marathi

महाराष्ट्र न्यूज

Maharashtra News Updates in Marathi: जाणून घ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी!