Maharashtra News Highlights: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रमुख वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या ‘देवाभाऊ’ या जाहिरातीचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही जाहिरात नेमकी कोणी दिली यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तसेच परकीय थेट गुंतवणुकीत (एफडीआय) महाराष्ट्राला मागे टाकून कर्नाटकने पहिला क्रमांक पटकाविला आहे. केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या (डीपीआयआयटी) आकडेवारीचा हवाला देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात आज सरकारकडून भूमिका जाहीर केली जाते का हे पहावे लागणर आहे. याबरोबरच राज्यातील पावसाच्या स्थितीवर देखील नजर असणार आहे.

Live Updates

Marathi News Live Updates :  मुंबईसह राज्यभरातील सर्व महत्त्वाच्या घडामो़डी वाचा एका क्लिकवर...

21:15 (IST) 8 Sep 2025

Manoj Jarange Patil on Maratha Reservation : प्रमाणपत्र न दिल्यास मराठवाडा मुक्तिदिनापासून राजकीय नेत्यांना बंदी

ही धमकी नाही तर विनंती आहे असे म्हणत जरांगे यांनी नव्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आग्रह धरण्यास सुरुवात केली. ...वाचा सविस्तर
20:48 (IST) 8 Sep 2025

Ashwini Kedari Death : जिल्हाधिकारी होण्याचे अश्विनी केदारींचे स्वप्न अधुरे; उकळते पाणी अंगावर पडल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू

MPSC PSI Topper Ashwini Kedari :अश्विनी या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत २०२३ मध्ये महाराष्ट्रातून मुलींमधून प्रथम आल्या होत्या. ...सविस्तर वाचा
19:58 (IST) 8 Sep 2025

Palghar News : बोईसर वंजारवाडा उड्डाणपूला विषयी चा निर्णय अंतिम टप्प्यात; भुयारी मार्गाबाबत अनिश्चितता

अस्तित्वात असलेल्या रेल्वे फाटकाच्या जवळून उड्डाणपूल उभारण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आले असून त्याकरिता ७७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी प्राप्त आहे. ...सविस्तर बातमी
19:57 (IST) 8 Sep 2025

संयुक्त किसान मोर्चा करणार विदर्भाचा दौरा; जाणून घ्या, देशभरातील नेते विदर्भात का येणार?

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन केले आहे. ...सविस्तर बातमी
18:48 (IST) 8 Sep 2025

Pimpri Chinchwad Crime News : 'स्टोरी आधी सांगू नका', 'शांत बसा' म्हटल्याने चित्रपटगृहात एकास मारहाण

'स्टोरी आधी सांगू नका' आणि शांत बसण्याची विनंती केल्यामुळे चित्रपटगृहात एका तरुणाला मारहाण केल्याची घटना चिंचवड येथील एका थिएटरमध्ये घडली. ...सविस्तर वाचा
18:37 (IST) 8 Sep 2025

Maratha OBC Reservation :"उत्तर महाराष्ट्रातील सर्व मराठा…" ओबीसी उपसमिती सदस्य गुलाबराव पाटील यांचे मोठे वक्तव्य !

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यानंतर हैदराबाद गॅझेटनुसार पात्र शेतकऱ्यांना कुणबी म्हणजेच ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. ...अधिक वाचा
18:27 (IST) 8 Sep 2025

Devendra Fadnavis Nagpur Vision Project : मुख्यमंत्री फडणवीसांच्या कल्पनेतील नवीन नागपूर 'असे' असेल !

नवीन नागपूर या नव्याने संकल्पित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि वितीय केंद्राचा विस्तार सुमारे १,७१० एकरांवर होणार आहे. ...अधिक वाचा
18:20 (IST) 8 Sep 2025

Rohit Pawar Fraud Allegation : पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार? रोहित पवार यांचा आरोप

या बाजार समितीतील गैरव्यवहार प्रकरणात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी गैरव्यवहार प्रकरणी मुद्दा उपस्थित केला होता. ...वाचा सविस्तर
17:54 (IST) 8 Sep 2025

सातासमुद्रापार 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष, स्कॉटलंडमधील 'अबर्डीन' गणेशोत्सवात रंगले

अकोल्यातील रेणुका नगर रहिवासी राजेश वानखडे हे स्कॉटलंड देशातील अबर्डीन शहरात स्थायिक झाले आहेत. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 8 Sep 2025

बावनकुळे यांचे रोहित पवारांना आव्हान, "आरोप सिद्ध करा, नाही तर राजकीय संन्यास घ्या!"

महसूल मंत्री बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी रोहित पवार यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. ...वाचा सविस्तर
17:18 (IST) 8 Sep 2025

Fire At Uran ONGC Plant : उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात आग; आग विझविण्यात यश आल्याचा प्रशासनाचा दावा

Uran ONGC Plant Fire या आगीनंतर प्रकल्पा शेजारी राहणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा म्हणून ओएनजीसी कडे जाणारे मार्ग आडविण्यात आले होते. ...सविस्तर वाचा
17:14 (IST) 8 Sep 2025

OBC Reservation: मराठा आरक्षणानंतर ओबीसी संघटना मुंबईच्या दिशेने, सरकारकडून एकाच संघटनेला निमंत्रण दिल्याने…

सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जीआरमुळे साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची सोमवारी मुंबईत बैठक होणार आहे. ...सविस्तर वाचा
16:57 (IST) 8 Sep 2025

‘हा’ रेल्वेमार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा; गर्भवती सांबरसह तीन अस्वल, एक रानगवा…

आठ सप्टेंबरला पहाटे १ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जाणारी चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसने रस्ता ओलांडणाऱ्या सांबाराच्या पिल्लाला धडक दिली व त्या पिल्लाचा जागीच मृत्यू झाला. ...सविस्तर वाचा
16:52 (IST) 8 Sep 2025

नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA, हुडको, NBCC यांच्यात करार

मध्य भारतातील प्रमुख शहर असलेल्या नागपूर शहराचा समावेश देशातील झपाट्याने विस्तारीत होणाऱ्या शहरांमध्ये केला जातो. ...सविस्तर बातमी
16:50 (IST) 8 Sep 2025

मंत्री, खासदार, आमदारांचे फोन नंबर होणार जाहीर.. कांदा उत्पादक संघटनेचे अनोखे आंदोलन

कांद्याच्या घसरलेल्या दराकडे राज्य व केंद्र शासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार करीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ...अधिक वाचा
16:31 (IST) 8 Sep 2025

स्मार्ट मीटर अपडेट… आता स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात हा पक्ष रस्त्यावर… महावितरणला इशारा देत…

महावितरणसह शासनाकडून स्मार्ट प्रीपेड मीटर चांगले असून वीज देयक अचूक येण्यास मदत होत असल्याचा दावा केला जातो. ...वाचा सविस्तर
16:30 (IST) 8 Sep 2025

Jethalal : ठाण्याच्या वागळे इस्टेटमधील जेठालाल कोण ? फेसबुकवरील फेक खात्यावरील संदेशाची सर्वत्र चर्चा

दिवंगत भाजप नगरसेवक विलास कांबळे यांच्या नावाने बनावट फेसबुक खात्यावरून प्रसारित होणाऱ्या संदेशात माजी नगरसेवकाचे थेट नाव घेतले जात नसून जेठालाल असा उल्लेख करण्यात येत आहे ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 8 Sep 2025

नवली भुयारी मार्गातील पाण्याच्या प्रवाहामुळे पुन्हा एकदा दुचाकी गेली वाहून, प्रशासना विरोधात नागरिकांमध्ये संताप

४ सप्टेंबर आणि ६ सप्टेंबर रोजी नवली भुयारी मार्गातील साचलेल्या पाण्यातून वाट काढताना पाण्याच्या प्रवाहासोबत दोन दुचाकी वाहून गेल्याची घटना घडली आहे. ...सविस्तर बातमी
15:40 (IST) 8 Sep 2025

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; नेमकी काय झाली चर्चा?

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार अमीन पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात देखील चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.

15:38 (IST) 8 Sep 2025

खबर पीक पाण्याची: अतिवृष्टी बाधित पीकविम्यापासून वंचित

पिकाचे कोणत्याही प्रकारे झालेल्या नुकसानीचे प्रतिबिंब पीक कापणी प्रयोगात दिसून येणे अपेक्षित आहे. पण, जमिनीत पीकच नसेल, संपूर्ण जमीन पुराच्या पाण्यात किंवा भूस्खलन होऊन खरवडून गेल्यास पीक कापणी प्रयोग कसा करायचा. ...सविस्तर वाचा
15:29 (IST) 8 Sep 2025

पोलीस आयुक्त व उपायुक्तांवर परिवहन मंत्री संतापले… बैठकीला गैरहजेरीमुळे मुख्य सचिवांकडे तक्रार

मिरा-भाईंदर शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी दौरा करून महापालिका मुख्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. ...अधिक वाचा
15:17 (IST) 8 Sep 2025

मराठा आरक्षणासाठी गंगाधर काळकुटे यांनी न्यायालयात दाखल केले कॅव्हेट

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुंबईत गेल्यानंतर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या, मागण्या मान्य करत असताना सरकारने जीआर काढला. मात्र, सरकारने काढलेला हा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेत्यांनी दिली आहे. त्यानंतर ओबीसी नेते या जीआर च्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे स्वतः छगन भुजबळ यांनी सांगितले. ओबीसी नेत्यांच्या या भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या शिलेदारांनी अगोदरच फिल्डिंग लावली आहे. कोर्टात कॅव्हेट दाखल करून कोणताही निर्णय देण्यापूर्वी कोर्टाने आमच मत समजून घ्यावं, असं या कॅव्हेटच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे. कॅव्हेट दाखल करणारे मनोज जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी याबद्दल माहिती दिली.

15:16 (IST) 8 Sep 2025

परळीत पोलीस ठाण्यासमोर फलकावर झळकले वाल्मीक कराडचे फोटो

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड याचा फोटो ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा फलकावर तसेच स्वागत कमानीवर झळकल्याचे दिसून आले आहे. ...सविस्तर बातमी
15:10 (IST) 8 Sep 2025

काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, माजी आमदार बाळासाहेब थोरात आणि आमदार अमीन पटेल यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज्यातील राजकीय परिस्थिती बाबत चर्चा करण्यात आली.

15:08 (IST) 8 Sep 2025

ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे मराठा समाज ओबीसी - अनिल देशमुख

हैदराबाद, सातारा आणि आता कोल्हापूर गॅजेटच्या आधारे कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाण्याची मागणी होत आहे. ...सविस्तर बातमी
14:56 (IST) 8 Sep 2025

परळी मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षाचा ना पदाधिकारी ना विसर्जन मंडप

कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा विशेष लोभ असलेल्या परळी मतदारसंघात त्यांच्या पक्षाची स्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत चालल्याचे दिसून येत आहे. ...वाचा सविस्तर
14:48 (IST) 8 Sep 2025

मोठ्या बिल्डरसाठी शेकडो एकर जमिन अकृषिक केली…पनवेलचे तहसीलदार चौकशीच्या फेऱ्यात… शासनाकडून तातडीचे निलंबन

मे. मेरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने २००७ साली औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी केली होती. २०२२ पर्यंत म्हणजे १५ वर्षात या जमीनीचा वापर औद्योगिक कारणांसाठी होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. ...सविस्तर बातमी
14:39 (IST) 8 Sep 2025

Maharashtra State Junior Athletics Championships 2025 : ठाणेकर ॲथलेटिक्स खेळाडूंची राज्यस्तरावर दमदार कामगिरी…

स्पर्धेत ठाणे शहरातील खेळाडूंनी बाजी मारली असून १३ सूवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्यपदके जिंकून महाराष्ट्र राज्य ज्युनियर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेवर आपले नाव कोरले आहे. ...अधिक वाचा
14:31 (IST) 8 Sep 2025

गोंदिया : शेतात गवत कापत असलेल्या शेतकऱ्यांसमोर अचानक आला वाघ… मग…

घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि एनएनटीआर बचाव पथक घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. ...वाचा सविस्तर
14:22 (IST) 8 Sep 2025

नागपूर: सोलार स्फोटातील मृत्यू संख्या दोनवर; मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाखांची मदत

कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या या मदतीला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दुजोरा दिला. ...अधिक वाचा