Maharashtra Rain News Highlights: मुंबईतील वांद्रे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची (शिंदे) महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदे यांनी या बैठकीत आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांसदर्भात आढावा घेतला. तसेच शिवसेनेने (शिंदे) नवीन अ‍ॅपच्या माध्यमातून पदाधिकारी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. “बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकला तसाच मुंबई मनपात महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे” अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दुसऱ्या बाजूला शिखर बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवार (राष्ट्रवादी – शरद पवार) यांना समन्स बजावण्यात आलं आहे. यासह आज न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंबंधीच्या घडामोडींवर आपलं लक्ष असेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज वर्धा दौऱ्यावर असून या दौऱ्याचे अपडेट्स आपण पाहणार आहोत. वर्ध्यात पोहोचताच अजित पवारांनी जिल्ह्याधिकाऱ्यां नाविचारलं की सर्व वाहनांवरील नेमप्लेट्सचे रंग एकसारखे का नाहीत? बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्याने भाजपाने मुंबईत ठिकठिकाणी बॅनरबाजी करत ठाकरे बंधुंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे ब्रँड कोमात, देवाभाऊ जोमात’ असे होर्डिंग्स अनेक ठिकाणी लावले आहेत. यावर शिवसेना (ठाकरे) व मनसेकडून काय प्रतिक्रिया येतेय याकडे सर्वांचं लक्ष आहे.

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये येत्या २४ ऑगस्ट रोजी इशारा सभा घेणार आहेत. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी मुंबईत उपोषण करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे. यासह राज्यातील इतर राजकीय व सामाजिक क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा आपण या लाइव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Breaking News Live Update : महाराष्ट्र व देशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.

18:51 (IST) 21 Aug 2025

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमुळे भाजपमधील वाद उघडकीस

आमदार प्रसाद लाड यांना कमी जागा आणि शशांक राव यांचा दणदणीत विजय या निकालाला भाजपमधील अंतर्गत वादच कारणीभूत ठरला आहे. ...वाचा सविस्तर
17:51 (IST) 21 Aug 2025

Raigad Rain Updates: कोकण विभागात यंदा रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस

अलिबाग रायगड जिल्ह्यात मागील सहा दिवस पावसाने झोडपून काढले असले तरी सर्व सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद झाली आहे. ...सविस्तर वाचा
17:51 (IST) 21 Aug 2025

आईच्या स्नॅपचॅट खात्यावरून परदेशातील मुलीवर पाळत...;अश्लील छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी

पीडित तरूणी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तिच्या आईच्या फिर्यादीवरून पवई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...अधिक वाचा
17:36 (IST) 21 Aug 2025

लहानग्या बहिणीला वाघाच्या हल्ल्यातून वाचवणारी 'राष्ट्रीय शौर्य पुरस्कार' विजेती धाडसी हाली रोजगाराच्या प्रतीक्षेत!

शहापूर तालुक्यातील हाली सध्या बेरोजगारीच्या गर्तेत सापडल्या असून, त्यांना जंगलातील गवत कापून त्याची विक्री करून जगावे लागत आहे. ...सविस्तर वाचा
17:28 (IST) 21 Aug 2025

pratap sarnaik : प्रताप सरनाईकांना हवी ठाण्यात ऑर्डर टॅक्सी…महापालिका आयुक्तांचे मात्र हे म्हणणे

मुंबई महानगरातील सर्वच शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पाॅड टॅक्सीचा प्रस्ताव पुढे आला होता. ...सविस्तर वाचा
17:19 (IST) 21 Aug 2025

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही टोल वसुली; राजू शेट्टी म्हणाले, "वसुली बंद न केल्यास..."

राजू शेट्टी म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर व कागल ते बेळगांव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांकडून टोल वसुली करता येणार नाही. काल याबाबत मी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना तातडीने या दोन्ही मार्गावरील टोल बंद करण्यात यावे याबाबत कायदेशीर मार्गाने नोटीस देण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबाबत कार्यवाही न केल्यास पुढील आठवड्यात अवमान याचिका दाखल करणार आहे."

17:00 (IST) 21 Aug 2025

Bharatsheth Gogavale : 'रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत भरतशेठ गोगावले काय म्हणाले पाहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री…

राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन जवळपास सात महिन्याचा कालावधी होत आला आहे.तरी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. ...अधिक वाचा
16:59 (IST) 21 Aug 2025

VIDEO : स्वस्तात भाजी घेणाऱ्यांनो सावधान, गटाराच्या पाण्यातच महिलेने भाज्या धुतल्या; नवी मुंबईतील किसळवाणा प्रकार होतोय व्हायरल

गटाराच्या पाण्यात एक भाजीविक्रेती महिला भाज्या धुत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्याप्रमाणात वायरल होत आहे. ...अधिक वाचा
15:55 (IST) 21 Aug 2025

शिखर बँक आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : रोहित पवार यांना विशेष न्यायालयाकडून जामीन

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. ...वाचा सविस्तर
15:43 (IST) 21 Aug 2025

पूर परिस्थितीमुळे ‘एमपीएससी’च्या परीक्षा आणि अर्जप्रक्रियेमध्ये बदल, आता अर्ज करण्यासाठी…

राज्यातील पूर परिस्थितीचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असून आता उमेदवारांना २५ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. ...सविस्तर बातमी
15:36 (IST) 21 Aug 2025

नितेश राणेंनी दिवसभर वराह अवतार धारण करावा, तरच हा सण साजरा करता येईल : सुषमा अंधारे

शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की "नितेश राणे यांना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच तर ते हा सगळा उत्सव साजरा करू इच्छितात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यानिमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करतानादिवसभर वराह अवतारात काढायला हवा. या अवतारात ही जयंती त्यांनी साजरी करायला हवी. तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल."

15:35 (IST) 21 Aug 2025

नितेश राणेंनी दिवसभर वराह अवतार धारण करावा, तरच हा सण साजरा करता येईल : सुषमा अंधारे

शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की "नितेश राणे यांना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच तर ते हा सगळा उत्सव साजरा करू इच्छितात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. यानिमित्ताने नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी हा दिवस साजरा करतानादिवसभर वराह अवतारात काढायला हवा. या अवतारात ही जयंती त्यांनी साजरी करायला हवी. तेव्हाच खरी वराह जयंती साजरी होऊ शकेल."

15:33 (IST) 21 Aug 2025

ब्राझीलमध्ये वर्ल्ड रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धा सुरु होण्याआधी माणिक कोकाटे यांचा…

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्ता काळे हिची रिओ येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५ साठी निवड झाली.स्पर्धा सुरु होण्यापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. ...सविस्तर बातमी
15:31 (IST) 21 Aug 2025

वराह जयंतीवरून महायुतीत तणाव! सत्ताधारी आमदार नितेश राणेंना म्हणाले, "वराह पकडून आणा अन्…"

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी म्हणाले, "वराह जयंती साजरी करायची असेल तर नितेश राणे यांनी सर्वप्रथम त्यांच्या घरापासून त्याची सुरुवात करावी. त्यांनी काही वहार पकडून आणावे आणि त्यांचं पूजन करावं. वराह पूजन म्हणजे वराहाच्या पोस्टरचं पूजन नव्हे तर त्यांनी प्रत्यक्ष वराह पकडून आणावे आणि त्यांच्या घरातच त्याची पूजा करावी."

15:31 (IST) 21 Aug 2025

आता डॉक्टरांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी ‘हेल्प लाईन’… निवासी डॉक्टरांची संघटना म्हणते…

आत्महत्या थांबवण्यासाठी फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फैमा) एक हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याद्वारे समुपदेशनातून देशभरातील डॉक्टरांच्या आत्महत्या थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. ...सविस्तर वाचा
15:16 (IST) 21 Aug 2025

मराठीसाठी पुण्यात ‘मराठीकारण’; सरकारविरोधात ‘हे’ एकत्र येणार…

सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे रविवारी (२४ ऑगस्ट) सकाळी दहा ते सायंकाळी साडे पाच या वेळेत ही परिषद पार पडणार आहे. समन्वय समितीच्या वतीने अजित अभ्यंकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...अधिक वाचा
15:13 (IST) 21 Aug 2025

Video : शहापूर तालुक्यात मुसई, साठगावमध्ये रात्रीच्या वेळेत भक्ष्यासाठी फिरतोय…बिबट्या की तरस?

आपल्या भागात बिबट्याचा वावर आहे हे माहित झाल्यापासून शहापूर तालुक्यातील मुसई, शिलोत्तर, साठगाव, शेणवे, कुलवंत, व्हेळोली गाव ह्द्दीत भीतीचे वातावरण आहे. ...सविस्तर वाचा
15:13 (IST) 21 Aug 2025

आता मुंबईकरांसमोर खड्ड्यांचे विघ्न...

ऐन गणेशोत्सवाच्या तोडांवर रस्त्यांची चाळण झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ...सविस्तर बातमी
15:12 (IST) 21 Aug 2025

मोनोरेलमधील ५८२ प्रवाशांची यशस्वी सुटका, मुंबई अग्निशमन दलाची कामगिरी अभिमानास्पद - भूषण गगराणी यांचे गौरवोद्गार

चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान, म्हैसूर कॉलनीजवळ मंगळवारी सायंकाळी मोनो रेलमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ५८२ प्रवासी अडकून पडले. ...अधिक वाचा
14:58 (IST) 21 Aug 2025

'वाह मॅडम, उत्कृष्ट कामगिरी' महसूल मंत्र्यापाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांनी दिली जिल्हाधिकाऱ्यांना शाबासकी.

परंतु वर्धा जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून अशा प्रकारची खरेदीचे कामांना मान्यता दिली नाही ही उल्लेखनीय बाब आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ...अधिक वाचा
14:55 (IST) 21 Aug 2025

गणेशोत्सवात अवैध वीज जोडणी घेणाऱ्यांनो सावधान… महावितरणचा इशारा

गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या व तत्पर वीजसेवा देण्यासाठी महावितरणची स्थानिक यंत्रणा सज्ज आहे ...सविस्तर बातमी
14:42 (IST) 21 Aug 2025

अकोल्यात अवैध सावकारीवर छापा; झाडाझडतीमध्ये आक्षेपार्ह धनादेश कागदपत्रे जप्त

पथक प्रमुख दीपक सिरसाट, श्रध्दा देशमुख, अनिता भाकरे, दिनेश गोपनारायण, विनोद खंदारे, महेंद्र परतेकी यांनी गोरखनाथ वानखडे यांच्याकडे छापा टाकत झाडाझडती घेतली. ...सविस्तर बातमी
14:31 (IST) 21 Aug 2025

“आपल्या बैलांवर लिहा, सातबारा कोरा-कोरा..!”, बच्चू कडूंनी दिला हा नारा...

२२ ऑगस्ट रोजी बैलपोळा हा सण साजरा केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी हा महत्वाचा सण मानला जातो. पोळ्याच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी नवीन घोषणा केली आहे. ...वाचा सविस्तर
13:56 (IST) 21 Aug 2025

"नथुराम गोडसेंचे विचार घराघरांत पोहोचले पाहिजेत", बाळासाहेब थोरातांना धमकावणाऱ्या किर्तनकाराची मुक्ताफळं

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये,”बाळासाहेब थोरात, आम्हाला देखील नथुराम गोडसे व्हावं लागेल हा… असे कीर्तनकार संग्राम भंडारे म्हणत आहेत. याच संग्राम भंडारे यांनी आता पुन्हा एकादा मुक्ताफळं उधळली आहेत. ते म्हणाले, "नथुराम गोडसे म्हटलं की लोकांना फक्त बंदूक आठवते. उलट गोडसेंचा अभ्यास करायला हवा, गोडसेंचं हिंदुत्व समाजासमोर यायला हवं. गेल्या ७५ वर्षांत नथुराम गोडसेंचे विचार कोणाच्या घरात पोहचू दिले गेले नाहीत. नथुराम गोडसे म्हणजे फक्त बंदूक नाही."

12:34 (IST) 21 Aug 2025

अजित पवार सुसाट ! "महसूल बुडला तरी बेहत्तर, एकही बिल थकवणार नाही; खासदारास अधिकार काय?"

आज जिल्हा दौऱ्यावर असलेल्या पवारांनी अधिकारी बैठक शांततेत आटोपली तर पत्रकार परिषद गाजवून सोडली. ...सविस्तर वाचा
12:27 (IST) 21 Aug 2025

एमपीएससीतून निवड झालेल्या ३२ इतर मागास बहुजन कल्याण अधिकाऱ्यांना नियुक्त्या

जानेवारी २०२५ मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी झाल्यावरही ओबीसी मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ३१ उमेदवार आताही नियुक्तीच्या प्रतीक्षेतच होते. ...सविस्तर बातमी
11:50 (IST) 21 Aug 2025

गणेशोत्सवात यंदा सात दिवस रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपक? मंत्री शेलारांनी स्पष्टच सांगितले…!

गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक मंत्री शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. ...सविस्तर वाचा
11:50 (IST) 21 Aug 2025

"कोणते जैन लोक कबुतरांवर बसून फिरायला जातात?" राज ठाकरेंचा टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, "तुमच्या घरात खूप उंदीर झाले तर तुम्ही काय करता? पळवून लावता ना? उंदीर हे गणपतीचं वाहन आहे म्हणून आपण घरात ठेवतो का? मला कळत नाही हे कोण असे जैन लोक आहेत जे कबुतरांवर बसून फिरायला जातात? काय त्या कबुतरांचं चाललंय? केवळ राजकारण केलं जातंय. कबूतरं मेली नाही पाहिजेत एवढाच त्यांचा अट्टाहास. माणसं मेली तर त्यांना चालतं. रेल्वेखाली माणसं मरतायत. खड्ड्यांमुळे लोकांचे जीव जातायत माणसांपेक्षा कबुतरं महत्त्वाची आहेत का? कबुतरांचा विषय त्यांनी राजकीय केला. तो राजकीय विषय त्यांना तसाच लावायचा होता. मात्र, त्यांच्या लक्षात आलं की आमच्याकडून काही प्रतिक्रिया येत नाही. मग त्यांनी तो विषय सोडून दिला."

11:50 (IST) 21 Aug 2025

उद्घाटनासाठी लाखोंचा खर्च केला मात्र 'ते' आले अन् चार मिनिटांतच गेले !

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. पुलाच्या औंधकडून शिवाजीनगरकडे जाण्याच्या बाजूचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. ...सविस्तर बातमी
11:48 (IST) 21 Aug 2025

अल्पवयीनाला कामावर ठेवल्याप्रकरणी उपहारगृह मालकाविरुद्ध गुन्हा

तक्रारदार हे एक सामाजिक कार्यकर्ते असून ते मुंबईतील ‘कम्युनिटी कमिटेड डेव्हलपमेंट ट्रस्ट’ या स्वयंसेवी संस्थेत कार्यकर्ते आहेत. या संस्थेकडून बालकामगार, तसेच बाल विवाह रोखण्यासंदर्भात कार्य केले जाते. १० ऑगस्ट रोजी यादव यांच्या संस्थेला माहिती मिळाली. ...सविस्तर वाचा