मुंबईला निघालेले मनोज जरांगे यांनी सगळ्या मराठा बांधवांना आपल्या आपल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं आहे. आम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला आहे. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

अंबड तालुक्यात संचारबंदी

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी तसेच जरांगे पाटील यांनी मुंबईला जावू नये याकरीता आग्रही असल्याने अंतरवाली सराटी येथे मोठया प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता असून, त्यामुळे धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग व तालुक्यातील इतर मार्गावर मोठया प्रमाणावर गर्दी जमून दळणवळण विस्कळीत होण्याची, सर्वसामान्य जनतेचे जनजीवन विस्कळीत होण्याची, गर्दीमुळे सार्वजनिक शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण अंबड तालुक्यात संचारबंदीचे आदेश लागू करण्याच्या निर्णय घेण्यात आला. तसेच, सदरील संचारबंदी आदेश दुकाने, आस्थापना यांनाही लागू राहतील. कोणत्याही प्रकारचे शस्त्र, ज्वलनशील पदार्थ, स्फोटके सोबत बाळगता येणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं. ज्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला.

Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती

मनोज जरांगे यांचं शांततेचं आवाहन

आपल्याला सगळ्या गोष्टी शांततेत करायच्या आहेत. आपण शांत राहून आंदोलन करु, ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळवू. आत्ता मी एकटा पुरेसा आहे. कुणीही या ठिकाणी थांबू नका आपल्या आपल्या गाड्या घ्या आणि गावाला परत जा हे मी सांगतो आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून इथून लवकर निघा. आपल्याला सगळ्या गोष्टी शांततेत करायच्या आहेत असंही जरांगे म्हणाले. तसंच त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

हे पण वाचा- “मनोज जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस, प्रसिद्धीसाठी मराठा मुलांचा…”, आता कुणी केले गंभीर आरोप?

मनोज जरांगे काय म्हणाले होते?

“माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यामागे देवेंद्र फडणवीस आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर राज्यात काहीच होऊ शकत नाही. फडणवीसांचं न ऐकल्यावर काय होतं, ते तुम्हाला सांगतो. जो माणूस स्वत:चा पक्ष कधीच सोडू शकत नाही, अशा लोकांवर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. एकनाथ खडसे यांच्यावर फडणवीसांमुळे भाजपा सोडण्याची वेळ आली. विनोद तावडे महाराष्ट्रातून कधीच बाहेर जाणार नव्हते. मात्र त्यांना दिल्लीला जावे लागले. नाना पटोले यांनादेखील फडणवीसांमुळे भाजपा सोडून जावे लागले. पंकजा मुंडे आयुष्यातही भाजपा सोडण्याचा विचार करू शकत नाहीत. मात्र भाजपात त्यांची घुसमट होत आहे. फडणवीस हे महादेव जानकर यांना धनगरांचा नेता म्हणून मोठं होऊ देत नाहीयेत,” असे जरांगे म्हणाले.

“ब्राह्मणी कावा थांबवला नाही तर…”

“देवेंद्र फडणवीस कोण आहेत, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. एकजूट झालेल्या मराठ्यांशी ते काय करू पाहतायत हे मला तुम्हाला सांगायचे आहे. कारण मला ही माहिती फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी सांगितली. माझ्याविरोधात फडणवीस बदनामीचे षडयंत्र वापरतील. फडणवीसांमुळे अनेकांना भाजपा सोडण्याची वेळ आली. मी ज्या लोकांची नावे घेत आहे, त्यांनी हे सगळं मान्य करायला हवं. ब्राह्मणी कावा मी माझ्याविरोधात चालू देणार नाही. मनोज जरांगे हे मराठ्याचं पोर आहे. हा ब्राह्मणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो,” असं मनोज जरांगे देवेंद्र फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तसेच मी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पायी जाणार आहे. मी रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या सागर बंगल्यासमोर नेऊन टाका, असे आवाहन त्यांनी मराठा आंदोलकांना केले.