वाई: पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांना सायंकाळी अडवल्याने काही वेळ गोंधळाचे वातावरण झाले. टोल वसुलीवरून वारकरी आणि टोल नाका कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. वारकऱ्यांनी टोलनाक्यावरील वाहतूक रोखत  रस्त्यावरच भजन करण्याचा निर्णय घेतला.बंदोबस्ता वरील भुईंज(ता वाई) पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक  सुरळीत केली.

हेही वाचा >>> “क्षुल्लक कारणासाठी शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा…” खासदार श्रीकांत शिंदे असं का म्हणाले?

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आळंदीला जाणाऱ्या कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या गाडीला आनेवाडी टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी अडवले. कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांकडे टोलची मागणी केली. वारकऱ्यांना टोल माफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले  असताना सुद्धा या  टोल नाक्यावर वारकऱ्यांची गाडी अडविण्यात आली. वारकऱ्यांकडे टोलची मागणी करण्यात आली.  मात्र वारकरी व टोल कर्मचाऱ्यांमध्ये दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली .वारकऱ्यांनी रस्त्यावर ठाण मांडून भजन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक खोळंबली. टोल नाक्यावर बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी टोल नाका कर्मचारी व वारकऱ्यांमध्ये मध्यस्थी करून केली. संत ज्ञानेश्वर माऊली च्या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आनेवाडी टोल नाक्यावर टोलसाठी अडवण्यात आल्याने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला.

हेही वाचा >>> सांगली: बिबट्याला वाचविण्यात वन विभागाला यश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिलायन्सच्या रघुविर सिंह या अधिकाऱ्यांने  वारकऱ्यांच्या गाड्यांच्या टोल वसुली साठी अडवल्यामुळे गाडीतील सर्व वारकरी आंदोलनाच्या पवित्र मध्ये रस्त्यावर उतरले त्यामुळे काही वेळ टोल नाक्यावर वाहतूक अडविली. वारकरी टोल नाक्यावर भजन करण्याच्या निर्णयाप्रत येऊन साहित्य घेऊन खाली उतरले. यावेळी टोल नाक्यावर बंदोबस्तावर असणाऱ्या भुईंज (ता वाई) पोलिसांनी वादामध्ये मध्यस्थी करून गाड्या सोडून दिल्या आणि वाहतूक सुरळीत करून दिली.मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसाठी टोल मुक्त करण्याची घोषणा केली असताना साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर मात्र वारकऱ्यांची टोल साठी अडवणूक होत असल्याने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.