scorecardresearch

“…अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे” संजय राऊतांवर टीका करत संदीप देशपांडेचं विधान!

“मी तिथे हजर असतो तर …” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

sandip deshpande and sanjay raut
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. यानंतर राज्यात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजपा व एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवरच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात असताना, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र हे प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेत जे विधान केलं, जे शब्द वापरले त्यावरून संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा – “अमित शहा हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू ” ठाकरे गटाचे टीकास्र!

“आरोप करणे ही रोजची गोष्ट आहे, ते अगदी सामान्य आहे पण त्यांनी (संजय राऊत) पत्रकारपरिषदेत अपमानास्पद भाषा वापरली. या प्रकारची भाषा सहन केली जाऊ शकत नाही. मी जर तिथे हजर असतो, तर त्यांना मारले असते. तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे भान हरपले आहे.” असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

याचबरोबर “भरपत्रकार परिषेदेत अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणाऱ्यांच्या कानाखालीच मारली पाहिजे पण उलट पक्षी ही बातमी कशी दाबता येईल हाच प्रयत्न चालू आहे. दुर्दैव महाराष्ट्राचं आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच.” असंही संदीप देशपाडे यांनी म्हणत संजय राऊतांवर टीका केली आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? –

सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी विरोधकांचे तळवे चाटले असा आरोप केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केला. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. पत्रकारपरिषदेत संजय राऊत म्हणाले, “मग आता काय चाटत आहेत सध्याचे मुख्यमंत्री? आता काय चाटत आहेत, ढुंगण चाटत आहेत का? काय चाटत आहेत? ही चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटुगिरीचं टोक आहे सध्या महाराष्ट्रात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 09:14 IST
ताज्या बातम्या