Supriya Sule and Sharad Pawar Viral Video : बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने मतदारसंघाच्या दौऱ्यानिमित्त फिरतीवर असतात. तर, राज्यसभेचे खासदार शरद पवारही विविध कामानिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर असतात. त्यामुळे या बाप-लेकीची अनेकदा बाहेर भेट होते. अनेक बैठकीत किंवा कार्यक्रमात हे दोन्ही खासदार एकत्रही दिसतात. आता त्यांचा एका नवा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात या बाप-बेटीची भेट तळपत्या उन्हात भर रस्त्यात झालीय. आपल्या वडीलांचा ताफा बघून सुप्रिया सुळेंनी त्यांची गाडी थांबवली आणि भर उन्हात रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी आपल्या आई-वडिलांची भेट घेतली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथील दौरा आटोपून खासदार सुप्रिया सुळे या पुरंदरकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी मोरगाव रस्त्यावरून शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार हे चारचाकी वाहनातून बारामतीच्या दिशेने जात होते. आई आणि वडीलांना पाहताच सुप्रिया सुळे यांनी गाडीतून उतरून आई-वडिलांची भेट घेतली आणि त्यांच्या दौऱ्याचा आढावा घेतला.

या भेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बाप-लेकीच्या नात्यातील जिव्हाळ्याचं दर्शन होईल असा व्हिडिओ काही वर्षांपूर्वीही व्हायरल झाला होता. त्यावेळी शरद पवारांच्या पायाशी बसून सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या पायात चप्पल घातली होती. लातूर जिल्ह्यातील किल्लारीच्या भूंकपाला आज ३० वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे लातुरात होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या पायाशी बसून त्यांनी स्वतःच्या हाताने पवारांच्या पायात चप्पल घातली होती. हा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.