महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. साताऱ्याच्या प्रसाद चौगुले याने या परीक्षेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून मानसी पाटील हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.

१३ जुलै २०१९ ते १५ जुलै २०१९ या कालावधीमध्ये राज्य लोकसेवा आयोगातून जी परीक्षा घेण्यात आली होती, त्याचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. एकूण ४२० पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. ज्यामध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा वेगवेगळ्या २६ पदांचा यामध्ये समावेश होता.

या परिक्षेचा अंतिम निकाल जवळपास दोन वर्षांनी लागला आहे. ज्यात साताऱ्याचा प्रसाद चौगुले राज्यात पहिला आला असून मानसी पाटील ही मुलींमध्ये राज्यात पहिली आली आहे. रोहन कुंवर हा मागासवर्गीयांमध्ये पहिला आणि राज्यात तिसरा आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रविंद्र शेळके हा परिक्षार्थी दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून दादासाहेब दराडे याने चौथा क्रमांक पटकावला आहे.