महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ७ ते ९ मे २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२१ चा अंतिम निकाल आज (१५ जून) जाहीर करण्यात आला. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ४०५ पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
यापरीक्षेमध्ये चौगुले प्रमोद बाळासाहेब हे राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून म्हात्रे सोनाली अर्जुनराव या महिलांमधून तसेच यादव विशाल महादेव हे मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आले आहेत.
हेही वाचा : MPSCकडून आनंदवार्ता! ‘या’ पदांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या एका क्लिकवर…


निकालाच्या आधारे शिफारस पात्र न ठरलेल्या उमेदवारांना उत्तरपुस्तिका, उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची असल्यास गुणपत्रके त्यांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने विहित पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना दिल्या असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली.
संपूर्ण यादी वाचण्यासाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला भेट द्या…