पुण्यामध्ये सोमवारी कोसळलेल्या विक्रमी पावसावरुन राजकीय नेत्यांकडून राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पावसामुळे झालेल्या नुकसानावरुन महानगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. याबाबत विचारलं असता “पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही” अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांचा हा समंजसपणा मुंबईमध्ये मुसळधार पावसानं पाणी साचल्यानंतर कुठे जातो? असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.

“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

“पुण्याची सत्ता भाजपाकडे आहे, तर मुंबईची सत्ता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाकडे आहे. मग दोन्ही ठिकाणी वेगळा न्याय का?” अशी विचारणा पेडणेकर यांनी केली आहे. पावसाळ्यात उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप करण्यात येतात, तेव्हा फडणवीस समंजसपणा का दाखवत नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. पुण्यासाठी दाखवलेला समंजसपणा मुंबईसाठीही दाखवा, असा सल्ला पेडणेकरांनी फडणवीसांना दिला आहे. पाऊस कधी पडावा, कसा पडावा, किती मिलीमीटर पडावा, हे १०० टक्के आपल्या हातात नाही, असेही पेडणेकर यांनी म्हटले आहे.

पुण्याला झोडपून काढणाऱ्या ढगाची उंची ११ किमी; जाणून घ्या नेमकं घडलं काय?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आहेत?

“पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. सोमवारी पुण्यात पडलेल्या पावसाने मागील १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. मागील २४ तासांत पुण्यात पडलेला पाऊस सर्वाधिक आहे. हे प्रमाण १०० वर्षांच्या रेकॉर्डपेक्षा थोडं कमी आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे”, असे भाष्य पुण्याच्या पावसावर देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

तुमच्यात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये नाराजी आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ड्रेनेज तयार करताना इतक्या पावसाचा विचार केलेला नसतो. भाजपाची सत्ता पाच वर्षांपूर्वी आली, हे ड्रेनेजचे डिझाईन भाजपाने तयार केलेले नाही. हे ड्रेनेज ४० वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ड्रेनेज लवकर तयार झाले पाहिजेत, यासाठी पुणे मनपा निश्चितपणे प्रयत्न करेल, असे फडणवीस यांनी सांगितले आहे.