कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात ७ नोव्हेंबर रोजी शिवसंवाद यात्रेनिमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकातील सभेला परवानगी नाकारत त्यांना अन्य जागेवर सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. नगरपालिका व पोलिसांनी शहरात वाहतुकीस अडथळा येत असल्याचे सांगत जागेमध्ये बदल सुचविला आहे. तर त्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे राजकीय कुरघोडीचा नवा डाव आता पोलीस प्रशासनामार्फत खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र आता आदित्य ठाकरे हे सभा न घेता थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्या ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – …पण मी सांगितलं होतं मी पुन्हा येईन ; आम्ही करेक्ट कार्यक्रम केला – देवेंद्र फडणवीसांचं विधान!

नरेश म्हस्के म्हणतात, “युवराज, आपल्याला माहीत आहे आदित्य रणछोडदास यांनी सिल्लोडची सभा रद्द केली आहे. अहो किती मोठ्या गप्पा मारता किती मोठ्या वल्गना करता. मुख्यमंत्र्यांना आव्हान देण्याच्या गोष्टी करता. आमच्या एका खासदाराला घाबरून तुम्ही ती सभा रद्द केलेली आहे. ”

हेही वाचा – “ज्यांना सत्तेत असुनही आपला पक्ष सांभाळता आला नाही, त्यांनी…”; खैरेंच्या दाव्यावर पटोलेंकडून प्रत्युत्तर

याशिवाय, “आपण एखाद्याशी स्पर्धा करायला जातो तेव्हा आपली योग्यता आपण तपासली पाहिजे. लक्षात ठेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने सर्व शिवसैनिक आहेत. तुमच्या सभेला कोणी येणार नाही म्हणून घाबरून आपण रणछोडदास झालेले आहात.” असंही नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा – ‘…सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’- सचिन सावंतांनी लगावला टोला!

याचबरोबर “अहो आम्ही दिलं असतं स्टेज तुम्हाला, सगळं काही रेडीमेड दिलं असतं. घ्यायची असती सभा, का नाही घेतली सभा? करायचं ना आमच्या खासदाराबरोबर चॅलेंज? केवळ मोठ्या गप्पा मारू नका, की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासमोर बसून चर्चा करावी. अशा वल्गना देऊ नका.” असं म्हणत नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरेंवर थेट टीका केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाहीर सभा ठरलीच नव्हती – अंबादास दानवे

सिल्लोड मतदारसंघात जाहीर सभा ठरलीच नव्हती. या तालुक्यातील लिहाखेडा या गावात शिवसंवाद यात्रेचा कार्यक्रम ठरविला होता. सिल्लोड शहरात शिवसैनिक आदित्य ठाकरे यांचा सत्कार करणार आहेत. त्यामुळे सिल्लोड येथे सभा नव्हतीच, असे विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबदास दानवे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले आहे.