Nawab Malik Mankhurd Shivaji Nagar Assembly constituency Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. कारण, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अनुशक्तीनगर येथून नवाब मलिक यांची लेक सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवाब मलिक आता बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून ते आता मानखूर्द शिवाजी नगर मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत सध्या जोरदार चर्चा चालू आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तिकिटावर अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं बोललं जात होतं. मात्र, गुरुवारी दिल्लीत यासंदर्भात महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना तिकीट देण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक यांचा हक्काचा मतदारसंघ त्यांच्या मुलीला गेल्यानंतर ते निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर खुद्द नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Congress List
Congress Candidates 3rd List : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; बाबा सिद्दिकींच्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले, “मला एक उदाहरण दाखवा की…”
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही गेले? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले, “…म्हणून मी आलो नाही”
Tejaswi Ghosalkar Nomination
Tejaswi Ghosalkar From Dahisar : मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी! फेसबूक लाईव्हदरम्यान हत्या झालेल्या नेत्याच्या पत्नीला उमेदवारी; महिलेविरोधात महिला सामना रंगणार!

हेही वाचा >> नवाब मलिक निवडणूक लढवणार, पण कुणाकडून लढणार? सना मलिकांच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

काय म्हणाले नवाब मलिक? (Nawab Malik From Mankhurd Shivaji Nagar)

नवाब मलिक म्हणाले, “मी शिवाजीनगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून २९ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार आहे. मला जनतेने निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला आहे. ज्याप्रकारे शिवाजीनगर मानखुर्द येथे आहे अंमली पदार्थांचा विळखा आहे. जनता त्रस्त असून त्यांना बदल हवाय. त्यामुळे मी निवडणूक लढवणार आणि जिंकणार आहे.”

“२९ तारखेला सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मी नविडणूक लढवणार असून कोणाला काय करायचं आहे याच्याशी आम्हाला देणं-घेणं नाही. गुंडागर्दी आणि नशामुक्त शिवाजी नगर करणं हाच निवडणुकीचा अजेंडा असेल”, असं नवाब मलिक म्हणाले.

 २००९ मध्ये नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयी झाले होते. २०१४ मध्ये शिवसेनेच्या तुकाराम कातेंनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. आता यावेळी हे दोन्ही नेते अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवत नसल्यामुळे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे.

उमेदवार२०१९२०१४२००९
नवाब मलिक६५,२१७ मतं३८,९५९ मतं३८,९२८ मतं
तुकाराम काते५२,४६६ मतं३९,९६६ मतं३२,१०३ मतं

मलिकांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध?

दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात भारतीय जनता पक्षाकडून नवाब मलिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. आत्ताही नवाब मलिक जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत आम्ही अजित पवारांशी सविस्तर बोललो आहोत. त्याामुळे ते योग्य तो निर्णय घेतील”, असं सूचक विधान बावनकुळेंनी केलं आहे. 

Story img Loader