सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत दोन माजी आमदारांसह ४४ जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विलासराव जगताप व राजेंद्र देशमुख या माजी आमदारांच्यावर जिल्हा कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भोसले-पाटील यांनी सांगितले, जिल्हा कार्यकारिणीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व सरचिटणीस आमदार शिवाजीराव गर्जे यांनी मान्यता दिल्यानंतर ही यादी जाहीर करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा कार्यकारणीमध्ये काम करण्याची संधी देताना सर्वाना विचारात घेऊन संधी दिली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहील. या दृष्टीने निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत. जिल्हा कार्यकारणीतील पदाधिकारी हे पक्ष वाढीसाठी विशेष प्रयत्न करतील असा विश्वास आहे.

जाहीर करण्यात आलेली जिल्हा कार्यकारिणी अशी आहे. कार्याध्यक्ष -माजी आमदार विलासराव जगताप व राजेंद्र देशमुख. जिल्हा उपाध्यक्ष- धैर्यशील मोरे, दत्ताजीराव पाटील, राजेंद्र वाघ, हणमंतराव कदम. सरचिटणीस- नरेंद्र दिक्षीत, शशिकांत देठे, तम्मानगौडा रवी-पाटील, तात्यासाहेब नलावडे. कोषाध्यक्ष- रणजीत माने. चिटणीस-राजेश लोखंडे, बळवंत मोरे, रंगराव संकपाळ, शरद पाटील, शिवाजीराव नांगरे, जितेंद्र शिंदे. संघटक सचिव- त्र्यंबक तांदळे , मोहन पाटील , पांडुरंग पाटील, प्रफुल्ल देशमुख. आणि सदस्य- शशिकांत साळुंखे, राजेंद्र जाधव, दत्ताजीराव माने, प्रकाशराव पाटील, मोहन जाधव, सुरेश पवार, आदित्य देशमुख , शिवाजी सावंत, अशोक मोरे, शामराव पाटील , रावसाहेब पाटील, मुकेश जगताप , शिवाजी तोरणे, श्रीरंग कदम, भाऊसाहेब गायकवाड, प्रमोद सावंत , नसीर मुल्ला, सहदेव कायापुरे , संभाजी पाटील, युवराज खामकर , प्रदिप शिंदे, हिम्मतखान येलूरकर, संतोष काळे