म्हाडा वसाहतीतील कार्यालय तोडण्यावरून शिवसेना नेते, आमदार अनिल परब आणि भाजपा नेते किरीट सोमय्या आमने-सामने आले आहेत. अनिल परबांचं कार्यालय तोडलं, तर पूर्ण दहशत निर्माण करता येईल हा किरीट सोमय्यांच्या माध्यमातून भाजपाने साधलेला डाव आहे का? असा सवाल आहे. तसेच, नारायण राणेंचं घर तोडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या तिथे माझ्याबरोबर येणार का? मी तिथे सर्व म्हाडातील लोकांना घेऊन जाणार, असा इशारा अनिल परब यांनी दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावर भाजपा आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “अनिल परबांनी तारीख आणि वेळ सांगावी, आम्ही त्यांच्यासाठी चहा तयार ठेवतो. कोरड्या धमक्या देऊ नये. न्यायालय न्यायालयाचं काम करेल. आमच्या घरात येऊन, धिंगाणा घालणं सोप्प नसून, हे ‘मातोश्री’ नाही. आम्ही पण असं स्वागत करू की परत राणेंच्या घराजवळ फिरकरणार नाहीत.”

हेही वाचा : अर्थसंकल्पातील ‘सप्तर्षी’वरून रोहित पवारांचा मोदी सरकारला खोचक टोला; म्हणाले, “अजित पवारांनी…”

“दुसऱ्यांची घरं पाडण्याची तक्रारी देणाऱ्या लोकांबरोबर कधीतरी नियती खेळ करत असतेच. आमचं, कंगणाचं घर तोडलं. कधी कोणाला अट केली. अनिल परब हे ‘मातोश्री’चे कारकून आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंमत नाही. उद्धव ठाकरे हे ना*** आहेत. त्यांना अनिल परबांसारखे कारकून लागतात. त्यामुळे अनिल परबांचं घर झाकी है ‘मातोश्री’ २ बाकी है. ‘मातोश्री’-२ मध्ये कोणत्याही शिवसैनिक आणि शिल्लक सेनेच्या नेत्याला प्रवेश नाही,” असा टोला नितेश राणेंनी लगावला.

हेही वाचा : “केंद्रीय अर्थसंकल्पातून मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसली”, विनायक राऊतांचं टीकास्त्र!

तसेच, “आमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्राचं राजकारण सुरुळीत आहे. हिंदूत्ववादी विचाराचं सरकार महाराष्ट्रात आलं आहे. महाराष्ट्राला कोणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ,” असं नितेश राणेंनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitesh rane attacks uddhav thackeray over anil parab mhada home ssa
First published on: 01-02-2023 at 15:21 IST