केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांना गंभीर इशारा दिलाय. “सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्रशिंग होतंय, पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा,” असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते सोलापूरमध्ये बोलत होते.

नितीन गडकरी म्हणाले, “आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्याचं उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता. आता बबन दादा सांगत होते त्यांचं २२ लाख टन ऊसाचं क्रशिंग झालं.”

“…तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल”

“एवढ्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात ऊसाचं क्रशिंग होतंय. मात्र, हा ऊस असाच जास्त लावत राहाल, तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा. कारण साखर सरप्लस झाली,” असा इशारा नितीन गडकरी यांनी दिला.

“ब्राझिलमध्ये साखर वाढली तर साखरेचा दर…”

नितीन गडकरी पुढे म्हणाले, “माझ्याकडे दोन दिवसांपूर्वी ब्राझिलचे मंत्री आणि शिष्टमंडळ आलं होतं. ब्राझिलमध्ये दुष्काळ पडला म्हणून बबनराव तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण ब्राझिलमध्ये साखर वाढली तर साखरेचा दर २२ रुपये प्रतिकिलो भाव होईल.”

हेही वाचा : विश्लेषण : ओलाने आपल्या १,४४१ इलेक्ट्रिक स्कुटर परत का मागवल्या? जाणून घ्या नेमकं काय घडतंय

“दुसरीकडे ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा,” असं म्हणत नितीन गडकरी यांनी कारखानदारांना इशारा दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.