शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना ते म्हणाले की, अनेकांना शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुखांनी मोठं केले. ज्यांना मोठे केले तेच विसरले. जे-जे देणे शक्य होते, ते सगळं दिलं. आता मातोश्रीवर अनेक लोक येऊन पाठिंबा देतायत. ज्यांना दिलं ते नाराज झाले आणि ज्यांना काहीच मिळाले नाही, ते सोबत आहेत. हीच शिवसेना सामान्यांच्या पाठिंब्याने सुरू आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, न्याय देवतेने निकाल दिलाय. राज्यपालांनी २४ तासात लोकशाहीचे पालन केले. पण १२ विधानपरिषद सदस्यांच्या यादीबाबत त्यांनी आताही निर्णय घ्यावा. उद्या बहुमत चाचणी असल्याने मुंबईत बंदोबस्त वाढवला आहे. अनेक शिवसैनिकांना स्थानबद्ध केलं जात आहे. त्याबाबतच्या नोटिसा त्यांना आल्या आहेत. केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान मुंबईत दाखल झाले आहे. कदाचित चीन सीमेवरची सुरक्षा देखील मुंबईत दाखल होईल.

व्हिडीओ पाहा –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मला खरंतर लाज वाटते, ज्या शिवसैनिकांनी या सगळ्या आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला होता. संपूर्ण रस्ते गुलालाने लाल झाले होते. त्यांच्या रक्ताने मुंबईचे रस्ते तुम्ही लाल करणार आहात का? एवढी माणुसकीही विसरलात का? एवढं नातं तोडलं? त्यामुळे उद्या कुणीही शिवसैनिकांनी यांच्यामध्ये येऊ नये. नविन लोकशाहीचा पाळणा हलणार आहे. मी सांगतो तुमच्यामध्ये कुणी येणार नाही. किती आमदार आहे लोकशाहीत डोकी फक्त मोजण्यासाठी होतो. मला उद्याचा खेळच करायचा नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला खेचण्याचे पुण्य त्यांना पदरी पडू द्या. त्यांचा आनंद मला हिसकावून घ्यायचा नाही.