उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या साडेतीनशेहून अधिक झाली आहे. तात्पुरत्या कारागृहातील सहा कैद्यांसह १९ जणांना बाधा झाल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे आजवर कोरोनाबाधितांची संख्या ३५४ वर पोहचली आहे.

९ व १० जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयमार्फत लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविालय व अंबाजोबाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबचे अहवाल शनिवारी प्राप्त झाले. यातील एकुण १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये  उस्मानाबाद शहरातील राम नगर येथील १, नेहरु चौक १, शहरानजीक शेकापूर येथील १  आणि तात्पुरत्या कारागृहातील ६ कैद्यांचा जणांचा समावेश आहे. सहा कैदी डाएटच्या जुन्या इमारतीत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहात विशेष निगराणीत आहेत.

भूम तालुक्यातही ५ कोरोनाबाधित आढळून आले असून वालवड १ आणि राळेसांगवी येथील ४ जणांचा समावेश आहे. उमरगा तालुक्यातही ४ जणांना लागण झाली असून ३ उमरगा शहर तर १ मुरूम शहरातील आहे. त्यामुळे मुरूम शहरातही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात आजवर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या  ३५४ वर पोहचली असून, २२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर १४ जणांचा बळी गेला आहे. उर्वरित रुग्ण उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात २७,  शासकीय आयुर्वेद महाविद्यालय उस्मानाबाद १२, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय २, कळंब येथील कोविड कक्षात २८, उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १८, उमरगा येथील खासगी रुग्णालय विजय क्लिनिक येथे ८ तर शेंडगे हॉस्पिटल २ यासह सोलापुरात ८, लातूर ५, पुणे १, बार्शी १ अशा एकुण ११२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.