सातारा : पाचगणी येथील एका निवासी शाळेमध्ये दोन मुलांचे त्याच वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी रॅगिंग केल्याचा प्रकार घडला. नववीतील दोन मुलांनी याच वर्गातील एका मुलाला अर्धनग्न केले. या भीतीने दोन्ही मुले पुण्याला पालकांकडे पळून गेली. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यानंतर हे प्रकरण पोलिसांनी सातारा येथे बाल न्यायालयाकडे पाठविले आहे.

पाचगणी येथे अनेक इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा आपला आब राखून आहेत. फार कडक शिस्तीने आणि खेळीमेळीच्या वातावरणात हजारो मुले येथे राहतात. नव्याने आलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी शाळेमध्ये रॅगिंग केले. या शाळेत १४ वर्षांचा मुलगा नववी इयत्तेत शिक्षण घेत आहे.

त्याने ६ जुलै रोजी पहिल्यांदा या मुलांवर रॅगिंग केले. त्यानंतर गुरुवारी (१० जुलै) संध्याकाळी दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्यानंतर सव्वासात वाजता त्याच्या पालकांना फोन करून माझ्या वर्गातील दोन मुले मला व माझ्या मित्राला मारहाण करीत आहेत. मला अर्धनग्न करत आहेत. त्यामुळे मी व माझा मित्र शाळेतून पळून एसटीने घरी येत आहोत, आता वाईपासून पुढे आलो आहोत, असे सांगितले. यानंतर संबंधित पालकांनी तातडीने त्यांच्या नातेवाइकाला पुण्यात मुले पोहोचल्यानंतर मुलांना भेटण्यास सांगितले.

रात्री दीड वाजता दोन्ही मुले पुण्यात सुखरूप पोहोचली. त्यानंतर त्यातील एका मुलाचे पालकही तेथे पोहोचले. मुलाकडे पालकांनी विचारपूस केल्यानंतर त्याने वर्गातील दोघांनी रात्री साडेआठ वाजता अर्धनग्न केले. यावेळी तेथे इतर मुलेही होती. ते दोघेजण मला मारून हसत होते. त्यानंतर घडलेला प्रकार मी आमच्या शाळेत सांगितला. अर्धनग्न न करता मारहाण करण्याची धमकी दिली, असेही त्या मुलाने पालकांना सांगितले. संतप्त पालकांनी याची माहिती पाचगणी पोलिसांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे प्रकरण पाचगणी पोलीस ठाण्यात तपासासाठी आले आहे. पोलिसांनी पालकांना बोलावून त्यांचे जबाब घेतले आहेत. ही मुले अल्पवयीन आहेत. त्यामुळे बाल न्यायालयात हे प्रकरण पाठविण्यात आले आहे. तसेच पोलीसही तपास करीत आहेत. – दिलीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक, पाचगणी.