अलिबाग : शेवट गोड करी… अशी आर्त साद देवाला घालणाऱ्या महाराष्ट्रातील संतांच्या भूमीत देशाला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाल्यानंतर ही शेवटच्या प्रवासासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. महाड तालुक्यातील चिंभावे ग्रामपंचायत मध्ये धनगर समाजातील १५० लोकवस्ती असलेल्या धनगर वाडीत जाण्यायेण्यासाठी आजही रस्ता नसल्याने जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतर टेकडीवर पायवाटेने चालत जावे लागते.

या गावातील दिपेश विठ्ठल माने यांचे ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथे अकस्मात निधन झाले. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कार साठी गावी आणण्यात आला मात्र गावात जायला रस्त्याच नसल्याने काठीला चादर बांधून डोली तयार करण्यात आली व त्यातून मृतदेह नेण्यात आला.

हेही वाचा…“मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला, पण…”; परमबीर सिंह यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावातील महिलेला देखील आजारपण तसेच प्रसूतीसाठी अशाच पध्दतीने आणले जाते. अंतिम दर्शनासाठी गावात आणलेल्या मृतदेह नेताना किती कसरत करावी लागली याचा हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.