महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ भूमिका राज ठाकरेंनी मांडली. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. याच दरम्यान त्यांना, आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय?’ असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. राज ठाकरे यांनी दिलेलं उत्तर ऐकून सर्वानाच हसू सुटले.
आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येतील काय? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर राज ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली. “ते मला काय माहित, तो प्रश्न त्यांना विचारा, त्याचं उत्तर मी कसं देऊ शकतो. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ साहित्य संमेलनासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळी त्यांना का हा प्रश्न विचाला नाही. त्यांच्या पक्षाच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ? ह्यांच्या घरी पोर होईल का याचं उत्तर मी काय देणार?” असे म्हणाताच पत्रकारपरिषदेत एकच हशा पिकला.
तुमचा राग कधी व्यक्त करणार?; पेपरफुटी प्रकरणी राज ठाकरेंनी मांडली भूमिका
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरही आपली भूमिका मांडली. राज ठाकरेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर बोलताना अनिल परब यांच्यावर निशाणा साधला.
“एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची ती आहे असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटनांना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिलेलं आहे ते लोकांसाठी दिलेलं आहे. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य दिलेलं नाही.” असं राज ठाकरे म्हणाले.
म्हाडाने सर्व परीक्षा रद्द राज ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. “या सर्व गोष्टी जनता गांभीर्याने घेत नाही. त्या वेळेपुरते चिडायचे, रागावायचे आणि निवडणुकांना मतदान भलत्याच विषयांवर केले जाते. निवडणुकांच्यावेळी सगळ्याच गोष्टी विसरल्या जातात. नको त्या विषयांवर मतदान करणार असाल तर तुमचा राग कधी व्यक्त करणार?” असा सवाल त्यांनी केला.