राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारपासून सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषद घेतली. निवडणुकीआधी शिवसेना मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरत असत असे म्हटले जात होते. ‘हे राजीनामे बाजूला ठेवण्यात आले आहेत’, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर आम्ही राजीनामा देण्यासाठी केव्हाही तयार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या प्रमाणे मुंबईमध्ये उपायुक्त दिला जाणार आहे त्याप्रमाणे सर्व प्रमुख महानगर पालिकांमध्ये दिला जावा अशी मागणी रामदास कदम यांनी केली. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यात पारदर्शकता हवी असे ते म्हणाले. निवडणुकीआधी शिवसेनेनी लावून धरलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी पुन्हा लावून धरला. जर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना का नाही मिळू शकत असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाने तेथील शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. जर आमचे सरकार आले तर आम्ही तुम्हाला कर्जमाफी देऊ. मग महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे तेव्हा तुम्ही अद्याप महाराष्ट्रात का कर्जमाफी दिली नाही असे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले वजन वापरावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन कर्जमाफी द्यावी असे रामदास कदम यांनी म्हटले.  रामदास कदम यांच्या पत्रकार परिषदे आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली.

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची राज्य सरकारची इच्छा आहे परंतु त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. युपीए सरकारच्या काळात कर्जमाफी देण्यात आली होती. परंतु ती शेतकऱ्यांना नव्हती तर बॅंकांना होती. तसे यावेळी होता कामा नये असे त्यांनी म्हटले. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील परिस्थिती संपूर्णपणे वेगळी आहे असे त्यांनी म्हटले होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत आम्ही गंभीर आहोत असे त्यांनी यावेळी म्हटले. परंतु त्याची अंमलबजावणी योग्य झाली पाहिजे असे आम्हाला वाटते असे फडणवीस यांनी म्हटले. या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना म्हटले आहे.