रामदास कदम हा ‘झपाटलेला’ सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो, अशी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रविवारी खेडच्या सभेत बोलताना केली होती. या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज खेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

हेही वाचा – Maharashtra News Live : “जीभ हासडण्याची हिंमत तुमच्यात आहे का?”; मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला रामदास कदमांचं प्रत्युत्तर, प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

काय म्हणाले रामदास कदम?

“भास्कर जाधव हा चिपळूणचा लांडगा, हा बाडगा बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत गेला आणि नंतर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत आला. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा बाडगा आज रामदास कदम पेक्षा स्वत:ला निष्ठावान समजतो आहे. हा ‘एहेसान फरामोर्श’ आहे. त्याला निवडणुकीसाठी गाड्या मी पाठवल्या होत्या. १९९५ मध्ये मी बाळासाहेबांना सांगून तिकीट द्यायला लावली होती. २००९ मध्ये उद्धव ठाकरेंनी माझ्या पराभवाची सुपारी दिली होती. त्यामुळे तू निवडून आला. पण आता गाठ माझ्याशी आहे, आता पुढच्या निवडणुकीत तुला गाडल्याशिवाय राहणार नाही”, असं प्रत्युत्तर रामदास कदम यांनी दिलं.

उद्धव ठाकरेंवरही सोडलं टीकास्र

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवरही टीकास्र सोडलं. “खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला. पण उद्धव ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी, योगश कदमांना पाडू शकणार नाहीत. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना ही खासगी कंपनी बनवून ठेवली होती. ते शिवसैनिक, आमदार, खासदारांना नौकर समजत होते”, असं ते म्हणाले. तसेच खोके घेतल्याच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. खोके आम्ही नाही तर तुम्ही घेतले, असं ते म्हणाले.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा, पण….” रामदास कदम उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन”

धनुष्यबाण चिन्हाबाबात बोलताना भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांना हासडायची भाषा ठाकरेंना शोभत नाही, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला बाहेरून माणसं आली होती. त्यांच्या कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.