वाई : शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी साताऱ्यातून लढायला तयार आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पवार यांनाच घ्यायचा आहे, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यात मांडली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात सर्वांत सक्षम उमेदवार कोण, हे शोधण्याचं काम सुरू आहे. तो उमेदवार सर्वमान्य असेल. माझं नाव काही लोकांनी आणि माध्यमांनी चर्चेत आणलं आहे. सातारा मतदारसंघात उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा सुरू आहे, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच आहे, माझी जयंत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. उमेदवाराचा निर्णय शरद पवार यांनी घ्यायचा आहे. शरद पवार जो उमेदवार देणार त्यामागे आम्ही पूर्ण ताकदीने मागे उभे राहू असं सांगितलं आहे. हा मतदासंघ हा तुतारीचा विषय आहे. तुतारीचा निर्णय त्यांनी घ्यायचा. सातारा लोकसभा काँग्रेसने लढवावी म्हणून प्रस्ताव अजून आला नाही, जर आला तर विचार करू. राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे यांचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सक्षम उमेदवाराचा अभाव जाणवतो आहे, त्यामुळे जर तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्ही लढणार काय, असे विचारले असता उमेदवारीच्या जर तर च्या प्रश्नावर मी बोलणार नाही, असे सांगितले.

हेही वाचा – ‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

हेही वाचा- “बच्चू कडूंचा भाजपशी थेट संबंध नाही, त्यांच्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील”, चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु असून पृथ्वीराज चव्हाण यांनी यावर खुलासा दिला आहे. हा मतदासंघ राष्ट्रवादीकडे गेला आहे. ४८ पैकी जवळ जवळ सर्व जागांवर एकमत झालं त्याप्रमाणे सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला आहे. भाजपाने जो ४०० चा नारा दिला आहे. आणि आम्हाला ३७० जागा तरी नक्की मिळतील असे भाजपा सांगत आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले यावेळी असे काही होणार नाही. २०१९ ला बालाकोट बॉम्बस्फोट झाला होता. त्याचा फायदा उचलत त्यांची सहा टक्के मते वाढली होती. त्यामुळे त्यावेळी जागा वाढल्या होत्या. यावेळी राम मंदिराचा भावनिक विषय होऊन त्याचा आपल्याला फायदा होईल असा भाजपचा व्होरा होता. पण असे होताना दिसत नाही. राम मंदिर हा विषय खाजगी आहे तो दोन ट्रस्टचा एकमेकातील विषय होता. त्या ठिकाणी राम मंदिर ट्रस्टने लोकांची मदत घेऊन बांधले. या मंदिराच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदींना बोलावले याचा अर्थ त्यांनी मंदिर बांधले असा होत नाही. त्यामुळे राम मंदिराचा फायदा भाजपाला होताना दिसत नाही. निवडणुकीच्या प्रचारात वेगळेच मुद्दे पुढे येताना दिसत आहेत. त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलायची आहे आणि मनुस्मृती आणायची आहे. त्यामुळे लोकसभेत ३७० जागा त्यांच्याकडे असणे गरजेचे आहे. परंतु असे काही होणार नाही आणि घटना बदलणे ही एवढी सोपी गोष्ट नाही, असे चव्हाण म्हणाले.