scorecardresearch

भगवद् गीतेनुसार भाजपा नेत्यांना मोक्ष मिळणं कठीण – काँग्रेस

भाजपाने भगवद्गगीता वाचली असती तर द्वेष, तिरस्कार सोडला असता..

पुढील वर्षापासून गुजरातमधल्या शालेय विद्यार्थ्यांना शाळेत भगवद् गीतेचे धडे शिकायला मिळणार आहेत. गुजरात सरकारने यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला आहे. गुजरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री जितू वाघानी यांनी यासंदर्भातली घोषणा केली. ६वी ते १२वीपर्यंतच्या वर्गांमध्ये अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश करण्यात आला आहे. गुजरात सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

शालेय अभ्यासक्रमात भगवद् गीतेचा समावेश, गुजरात सरकारचा मोठा निर्णय!

“भगवद्गीता संघ/भाजपा नेत्यांनी वाचली असती तर द्वेष, तिरस्कार सोडला असता (अ.१२/श्लोक १३-१४), भोंदू साधू, साध्वी योगींना थारा दिला नसता (अ.६/४ व२९), मोदी कमी झोपतात सांगितले नसते (अ.६/१६) १६वा अध्याय भाजपासाठीच आहे. गीतेनुसार भाजपा/संघ नेत्यांना मोक्ष मिळणे मुश्कील आहे,” असं सचिन सावंतांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

काय आहे गुजरात सरकारचा निर्णय?

“भारतीय संस्कृती आणि ज्ञान व्यवस्थेचा शालेय शिक्षण व्यवस्थेमध्ये समावेश करण्यात येणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून हा बदल होईल. भगवद् गीतेतील मूल्य आणि तत्व प्राथमिक स्तरावर इयत्ता ६वी ते १२वीच्या वर्गांमध्ये शिकवले जातील”, अशी माहिती जितू वाघानी यांनी सभागृहात दिली होती. ६वी ते ८वीच्या अभ्यासक्रमांमध्ये भगवद् गीतेतील पाठ सर्वांगी शिक्षण पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. ९वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक भाषेमधून गोष्टीच्या स्वरूपात भगवद् गीता समाविष्ट करण्यात येईल, असं वाघानी यांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin sawant slams bjp leader over adding bhagavad gita in gujrat syllabus hrc

ताज्या बातम्या