Manoj Jarange Patil Protest for Maratha Reservation : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन देत मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घ्यायला लावलं होतं. त्यानंतर जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत सरकारने पाळली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी जलत्यागही केला आहे. त्यामुळे सर्वांनाच मनोज जरांगे पाटील यांची काळजी वाटू लागली आहे. दरम्यान, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट दिली आणि त्यांना पाणी पिण्याची विनंती केली.

संभाजीराजे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. संभाजीराजे म्हणाले, मनोज जरांगे पाटील परत एकदा बेमुदत उपोषण करतोय. म्हणून मी त्याला भेटायला आणि त्याच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला इथे आलो आहे. त्याची धडपड मला दिसतेय. समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून तो हे सगळं करतोय. दरवर्षी

संभाजीराजे म्हणाले, मी मनोजला अनेक वर्षांपासून बेमुदत उपोषण करताना बघतोय. अनेक वेळा उपोषणामुळे त्याला किडण्यांचा त्रास झाला, बिचाऱ्याला चालताही येत नव्हतं. उपोषणानंतर एक-दोन कार्यक्रमांमध्ये मी त्याला पाहिलं. लोकांचा हात धरून, काठी घेऊन चालायचा. आजच्या काळात समाजासाठी एवढं कोण करतं? त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा वंशज म्हणून मनोजला बळ देण्याची आमची जबाबदारी आहे. मी माझं कर्तव्य समजून इथे आलो आहे.

हे ही वाचा >> गिरीश महाजनांचा फोन का उचलला नाही? मनोज जरांगे म्हणाले, “त्यांना नुसतं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी खासदार म्हणाले, जो समाजासाठी लढतो, समाज अडचणीत असताना लढतो, त्याला ताकद देण्याचं, त्याला पाठबळ देण्याचं काम छत्रपती घराण्याचं आहे. समाजाला न्याय मिळावा ही एकच भावना ठेवून मनोज परत उपोषणाला बसला आहे. मनोजने जलत्याग केला आहे. यावर मला काहीच बोलता येत नाहीये. परंतु, त्याने किमान पाणी तरी प्यावं ही माझी विनंती आहे. छत्रपतींच्या नात्याने मला थोडासा अधिकार आहे. मनोजने हे उपोषण करावं. परंतु, किमान पाणी तरी प्यावं, असं मला वाटतं. त्यामुळे मी त्याच्याकडे पाणी पिण्याची विनंती करतो. मनोजच्या या आंदोनाला माझा पाठिंबा आहे. परंतु, त्याने जलत्याग आंदोलन करू नये, असं मला वाटतं.