आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी तत्कालीन मुंबई एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, नंतरच्या काळात नवाब मलिक यांनाच तुरुंगात जावं लागलं. याबाबत समीर वानखेडेंना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (२४ ऑगस्ट) वाशीममध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुमच्यावर आरोप करणारे नवाब मलिक तुरुंगात आहेत आणि तुम्ही बाहेर आहात याकडे कसं बघता?”, असा प्रश्न समीर वानखेडेंना विचारण्यात आला. त्यावर समीर वानखेडे म्हणाले, “त्या व्यक्तीविषयी मला काहीही भाष्य करायचं नाही. त्यांनी माझ्यावर खालच्या स्तरावरील आरोप केले होते. त्यामुळे मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही.”

“तुमचा भाजपाशी संबंध आहे या आरोपावर काय सांगाल?”

भाजपाशी संबंध असल्याच्या आरोपाबाबत विचारलं असता समीर वानखेडे म्हणाले, “मी कायदा पाळणारा माणूस आहे आणि केवळ संविधानाचं पालन करतो.”

“कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का?”

यावेळी समीर वानखेडे यांना त्यांच्या कुटुंबातून कुणी राजकारणात येणार का? आणि वाशीममध्ये कुणी उभं राहणार का? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर वानखेडे म्हणाले, “याविषयी मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी भारताचा एक सेवक आहे आणि सर्वप्रकारे सेवा करत राहीन.”

“पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का?”

पुन्हा महाराष्ट्रात काम करण्याची इच्छा आहे का? या प्रश्नावर समीर वानखेडे म्हणाले, “मला भारतात कुठेही पाठवलं तरी मी काम करेन. मी एक शिस्तबद्ध सैनिक आहे.”

हेही वाचा : “मी सांगतो वानखेडेंवर कोणतीही कारवाई होणार नाही”; आर्यन खानवरील आरोप रद्द केल्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहा :

आर्यन खानला न्यायालयाने क्लीन चिट दिली त्यावर काय सांगाल, क्लीन चिट मिळाली म्हणजे तपासात कमी पडले का? असेही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर वानखेडे म्हणाले, “ते प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. मी एनसीबीत कार्यरत देखील नाही. त्यामुळे त्यावर काही बोलणं योग्य नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sameer wankhede comment on nawab malik allegations and ed arrest rno news pbs
First published on: 24-08-2022 at 17:19 IST