आर्यन खान प्रकरणाचा तपास काढुन घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

दिल्लीतील एनसीबीची नवी टीम मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे.

Sameer-Wankhede-4
समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. आता एनसीबीची नवी टीम मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या केसचा देखील समावेश आहे. समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्याचवेळी समीर वानखेडे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून समीर वानखेडेची हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे एक पथक उद्या म्हणजेच शनिवारी मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनमधील आर्यन खान प्रकरणासह इतर ५ अशा ६ प्रकरणांची चौकशी करेल.

मोठी बातमी! समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढला! नवाब मलिक म्हणतात, “ही तर फक्त…!”

एएनआयच्या माहितीनुसार, एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण ६ प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर ५ प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय होता.

समीर वानखेडे यांनी एएनआयला सांगितले की, “मला तपासातून वगळण्यात आलेले नाही. या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत व्हावा, अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे. दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघांमध्ये हा एक समन्वय आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede first reaction after being dropped from the aryan khan case srk

ताज्या बातम्या