आर्यन खान अमली पदार्थप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी शनिवारी पाच तास चौकशी झाली. आज पुन्हा त्यांची चौकशी होणार असून चौकशीसाठी रवाना होण्याआधी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझा नक्कीच विजय होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

शनिवारी पाच तास चौकशी झाल्यानंतर चौकशीदरम्यान संपूर्ण माहिती न मिळाल्याने वानखेडे यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. समीर नावखेडे यांच्याकडे एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी जबाबदारी असातना त्यांच्या पथकाने ऑक्टोबर २०२१ मध्ये मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर छापा घातला होता. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही तब्यात घेण्यात आले होते. त्याला सोडवण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाप्रकरणी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासही केला. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयने शनिवारी त्यांची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रभादेवीमधील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Patanjali Expresses Regret
एका आठवड्यात जनतेची जाहीर माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाचा बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांना आदेश
I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा

आज ते चौकशीसाठी रवाना होत असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “चौकशीत काय होईल सांगता येत नाही. आम्ही फक्त सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. विजयी भवसाठी आम्ही सिद्धिविनायक मंदिरात गेलो होतो. आमचा विजय नक्की होणार आहे. मला न्याय मिळणार असून मी जिंकणार आहे. वंदे मातरम!” असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.