सांगली : कृष्णेचे पाणी पात्रात परतले असून, आता पुरामुळे स्थलांतर केलेल्या नागरिकांची घरी परतण्याची लगबग सुरू झाली आहे. चिखलमय झालेले रस्ते, नदीघाट स्वच्छ करण्याची मोहीम शनिवारी हाती घेण्यात आली होती. रहिवाशांनी घरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला.

सांगली शहरातील मगरमच्छ कॉलनी, दत्तनगर, कर्नाळ रस्ता, पटवर्धन प्लॉट, जुना बुधगाव रोड आदी भागातील पुराचे पाणी ओसरले असून, सूर्यवंशी प्लॉट परिसरात अद्याप पाणी साचून आहे. उद्यापर्यंत या ठिकाणचेही पाणी ओसरेल अशी स्थिती आहे. गेल्या २४ तासांत ८ फुटांनी पाणीपातळी कमी झाली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आल्याने आणि अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग अद्याप सुरूच असल्याने नदीतील पाण्याला गतीने उतार पडत आहे.

काही पूरग्रस्त भागातील नागरिक आपल्या घरी परतू लागले असून, आज घरातील सांसारिक साहित्याची स्वच्छता सुरू केली आहे. महापालिकेच्या वतीने पुराच्या पाण्यामुळे आलेला कचरा संकलित करण्याबरोबरच पूरग्रस्त भागात औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्यान, दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विविध ठिकाणी भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. पाटील यांनी आज वाळवा तालुक्यातील जुने खडे, पलूस तालुक्यातील भिलवडी येथे मौलानानगर येथे जाऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. तसेच औदुंबर येथे पुराचे पाणी शिरलेल्या दत्त मंदिरातील स्वच्छतेची पाहणी केली. सांगलीत त्यांनी मगरमच्छ कॉलनीत जाउन पाहणी केली. तसेच महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी उभारलेल्या निवारा केंद्रात जाऊन सेवांची माहितीही घेतली.

पूरग्रस्त भागातील नागरिक आपल्या घरी परतू लागले

दरम्यान कृष्णेचे पाणी पात्रात परतले असून, आता पुरामुळे स्थलांतर केलेल्या नागरिकांची घरी परतण्याची लगबग सुरू झाली आहे. काही पूरग्रस्त भागातील नागरिक आपल्या घरी परतू लागले असून, आज घरातील सांसारिक साहित्याची स्वच्छता सुरू केली आहे.

घाट स्वच्छता

पूर ओसरल्यावर सांगली महापालिकेच्या वतीने शहरातील पूरग्रस्त रस्ते, घाटांच्या स्वच्छता मोहीमेस शनिवारी सुरुवात केली आहे.

पूरग्रस्त भागात औषध फवारणी

पुराच्या पाण्यामुळे आलेला कचरा संकलित करण्याबरोबरच पूरग्रस्त भागात औषध फवारणी करण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.