शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नसून उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असं ते म्हणाले. तसेच ‘धनुष्यबाण’ निशाणी आणि ‘शिवसेना’ हे नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पंकजा मुंडे आज अर्ध्या तासासाठी बाळगणार मौन, पण नेमकं कारण काय?

काय म्हणाले संजय राऊत?

“ठाकरे गट वगैरे आम्ही मानत नाही. जिथं उद्धव ठाकरे तीच खरी शिवसेना आहे. बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई वाया जाणार नाही. महाराष्ट्राची जनता आयोगाच्या निर्णयाकडे बघत आहे. जरी एका बाजुने निकाल द्यायचा दबाव निवडणूक आयोगावर आहे, मात्र, तरीही धनुष्यबाण निशाणी आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी सुरू असून न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “…तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांची डोकी भरकटली”; तंत्र-मंत्र, करणीचा उल्लेख करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरुन सेनेचा टोला

“मुख्यमंत्री भावूक झाल्याचे केवळ ढोंग”

“समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी मुख्यमंत्री भावूक झाल्याचे बघायला मिळाले, हे सर्व ढोंग आहे. फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पण तिथे कुठेही बाळासाहेबांचा सन्मान राखला जाईल, असे वर्तन कोणी केले नाही. यावेळी जे बॅनर लावण्यात आले होते, त्यावर चौथ्या क्रमांकावर बाळासाहेबांचा फोटो लावण्यात आला होता. ज्या ११ ताऱ्यांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला, त्यातले पहिले दोन तारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे, या दोन्ही ताऱ्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न काल झाला. यापैकी शिवाजी महाराज तर प्रखर सूर्य आहेत, सूर्यावर थुंकणाऱ्यांना व्यासपीठावर बसवण्यात आले होते”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांचे शहर एका रस्ते अपघाताने झाले ठप्प; पाच मिनिटांच्या अंतरासाठी लागत आहे पाऊण तास

“ती थाप पाठीत खंजीर खुपसल्याची होती का?”

काल पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठीवर थाप दिली, ती थाप तुम्ही जो खंजीर आमच्या पाठीत खुपसला त्याबद्दल होती का? असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – नागपूर : खासदार महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पोलिसांचा लाठीमार; काही युवक जखमी

सीमाप्रश्नावरून राज्य सरकारवर टीका

दरम्यान, आज कर्नाटकचे खासदार सीमाप्रश्नावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. याबाबत विचारलं असता, “आज कर्नाटकचे काही खासदार अमित शहांना भेटत असतील, तर त्यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. हा प्रश्न सामोपचाराने सुटत असेल तर सुटायला हवा. हा प्रश्न बोम्मईंनी निर्माण केला, सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरू असताना अचानक तुम्ही महाराष्ट्राच्या गावांवर हक्क सांगता? याची गरज नव्हती”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यावरून त्यांनी शिंदे सरकारलाही लक्ष केलं. “सीमाप्रश्नावर राज्य सरकार गंभीर नाही. यावर ते बोलायला तयार नाही. काल पंतप्रधांनांसमोर काही तरी बोलतील, असं वाटलं होतं, मात्र, ओशाळल्यासारखे उभे होते, असं लक्षात आलं. हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticized shinde group before election commision hearing on bow n arrow sign spb
First published on: 12-12-2022 at 10:15 IST