सुप्रिसद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल (२ ऑगस्ट) कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंत हरहुन्नरी आणि मराठी-बॉलिवून विश्वात यशस्वी ठरलेल्या या कला दिग्दर्शकाने आत्महत्या केल्याने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर २५० कोटींचं कर्ज होतं, हे कर्ज फेडू न शकल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. परंतु, नितीन देसाई यांच्या आत्महत्येवरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

“नितीन देसाईंसारखा कला दिग्दर्शक हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत स्वतःच्या कर्तृत्वावर हिंमतीने उभा राहिला. या देशातील उत्तम असा कला स्टुडिओ एन. डी स्टुडिओ कर्जत येथे उभा केला. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा मृत्यू झाला, त्याला मृत्यूला कवटाळावं लागलं, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “मी पहिल्या दिवसापासून म्हणत आलोय की…”; BMC तील घोटाळ्यांप्रकरणी आदित्य ठाकरेंचे सरकारवर गंभीर आरोप

“एका बाजूला हजारो कोट्यवधी रुपये घेऊन लोक देशातून पळत आहेत. बँकांना बुडवताहेत, भाजपासोबत असणाऱ्यांना कर्जमाफी केली जाते. त्यांच्यावर कारवायाच होत नाहीत. पण हरहुन्नरी मराठी माणूस मात्र शे-दिडशे (कोटी) रुपयांचं कर्ज फेडू शकला नाही. जे स्वप्न एनडी स्टुडिओच्या माध्यमातून उभं केलं ते स्वप्न विखुरताना दिसतंय, हा स्टुडिओ कोणीतरी जप्त करेल हे सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या केली, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >> मुलं परदेशातून आल्यावर कर्जतच्या ND स्टुडिओमध्येच नितीन देसाईंवर होणार अंत्यसंस्कार, पोलिसांची माहिती

“मला असं वाटतं की त्यांच्या सुसाईड व्हॉईस नोटमधील माहिती समोर आणली पाहिजे. देशाला आणि महाराष्ट्राला कळलं पाहिजे अशाप्रकारचे उद्योगपती जे प्रामाणिक आहेत, मेहनती आहेत, त्यांना सध्याच्या काळात कोणत्या संकटांना समारं जावं लागतंय. आपल्या समोर आपलं स्वप्न उद्ध्वस्त होत आहेत, त्यामुळे त्यांना आत्महत्या करताहेत. ते देश सोडून पळून गेले नाहीत. त्यांनी कोणाला फसवलं नाही, हे महत्त्वाचं”, असंही संजय राऊत म्हणाल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनडी स्टुडिओला चित्रनगरीचा दर्जा द्या

एनडी स्टुडिओ नितीन देसाईंचं स्वप्न, मराठी माणसाचं स्वप्न होतं. महाराष्ट्रात तुम्ही नव्या चित्रनगरीची योजना आखत असाल तर कर्जतच्या स्टुडिओलाच चित्रनगरीचा दर्जा द्या, असंही संजय राऊत म्हणाले.