लोकसभा निवडणूक या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी स्थापन केली. नरेंद्र मोदींचा आणि भाजपाचा पराभव करणं हा इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश होता. मात्र इंडिया आघाडीतून नितीशकुमार वेगळे झाले. ममता बॅनर्जींनी स्वबळाचा नारा दिला. यामुळे इंडिया आघाडी काहीशी खिळखिळी झाली आहे का? याची चर्चा सुरु झाली. आता शरद पवारांनी इंडिया आघाडीतल्या मतभेदांवर भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

इंडिया आघाडीत काही ठिकाणी वादविवाद आहेत. मात्र ते मिटवण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत. आम्ही सगळे एकत्र आहोत. मोदी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी आम्ही एकत्र काम करतोय, असं शरद पवार म्हणाले.

इंडियाआघाडीतील वादावर पवारांचं वक्तव्य

इंडिया आघाडीची अलिकडे बैठक झाली नाही. काही पक्षांची भूमिका त्या त्या राज्यपूर्ती सीमित आहेत. काही राज्यात वादविवाद आहे, हे नाकारता येत नाही. उदाहरणार्थ पश्चिम बंगाल याठिकाणी आम्ही परिस्थितीवर चर्चा अजून झाली नाही. काँग्रेस पक्षाचे मल्लिकार्जुन खरगे हे अध्यक्ष आहे. महाराष्ट्रातील चर्चेबाबत आमच्याकडून मी असत नाही. आमच्याकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि सेनेकडून संजय राऊत चर्चा करतात. निपाणी लोकसभेच्या बाबतीत आम्ही चर्चा करतोय. सुदैवाने कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे पण वाचा- “भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजपा बरा..”, शरद पवार यांची टीका

महाराष्ट्रातील तीन जागांबाबत महाविकास आघाडीत निर्णय झाला नाही उद्या याबाबत बैठक होणार आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला आश्चर्य वाटत नाही. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख श्वेतपत्रिकेत आला होता. तेव्हाच वाटलं होतं की अशोक चव्हाण वेगळा निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर जे व्हायचं ते झालं, असं म्हणत अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरावर शरद पवारांनी भाष्य केलंय.