स्वबळावर शिवसेना निवडणूक जिंकेल – सुभाष देसाई

शिवसेना प्रमुख बाबासाहेब ठाकरे यांना पुष्पांजली वाहिल्यानंतर मेळाव्यात देसाई बोलत होते.

बाबासाहेब ठाकरे यांना पुष्पांजली वाहिल्यानंतर मेळाव्यात देसाई बोलत होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका केव्हाही होवोत कोकणातील सातही खासदार कडवट शिवसैनिकच असतील तसेच राज्यात स्वबळावर शिवसेना निवडणूक जिंकून विधानसभेवर भगवा फडकवेल असा विश्वास शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख बाबासाहेब ठाकरे यांना पुष्पांजली वाहिल्यानंतर मेळाव्यात देसाई बोलत होते. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक, विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, प्रकाश परब, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, बाबूराव धुरी, बाळा दळवी, राजू नाईक, एकनाथ नारोजी, शब्बीर मणियार, जान्हवी सावंत, दोडामार्ग सभापती गणपत नाईक, वेंगुर्ला सभापती यशवंत परब, अपर्णा कोठावळे, अजित सावंत, चंदन गावकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारे संपले असे सुभाष देसाई यांनी सांगून छगन भुजबळ यांची काय अवस्था आहे त्यांनी मिळविलेली संपत्ती कुठे उपयोगी पडली नारायण राणेंनी बाळासाहेबाना दगा दिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ते आमच्या हृदयात आहे. ते लपून बसले होते आता तर ते भाजपाच्या आसरयाला गेले आहेत. भाजपला माहीत नाही की पुढील सत्ता त्यांची असेल की नाही असा टोला हाणत राणेंवर देसाई यांनी प्रहार केला.

नाणार च्या ग्रिन रिफायनरीला विरोध करणाऱ्या नारायण राणे यांनी जैतापूर प्रकल्पाला पािठबा दिला. त्यामुळे ते कोकणवासीयांची दिशाभूल करत आहेत त्याच्या या ढोंगी भूमिकेमुळे त्यांच्या पक्षाचे नाव स्वाभिमान ऐवजी स्वार्थाभिमान ठेवावे असे देसाई यांनी सांगून नाणार प्रकल्पाला शिवसेनाचा विरोध आहे आणि त्यासाठी मंत्रीपद सोडण्याची तयारी माझी आहे. त्यांनी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांचे तोंडभरून कौतुक केले. अर्थसंकल्पमध्ये सिंधुदुर्ग साठी प्रकल्प आणि आर्थिक तरतूद पाहता दुसरया जिल्यासाठी काही शिल्लक आहे की नाही असा आनंद व्यक्त करत त्यांनी कोपरखळी आणून शिवसेना प्रमुख यांच्या विचारांचे काम केसरकर करत आहे म्हणून कौतुकही केले.

या मेळाव्याला उपस्थित महिला आणि गर्दी पाहून शिवसेनेचे वलय कोकणात वाढत आहे याबाबत समाधान व्यक्त करत पुढील काळातील महाराष्ट्रची सत्ता शिवसेना स्वबळावर जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे साहेब रयतेसाठी अहोरात्र झटत आहेत त्यांच्या मनात महाराष्ट्राच्या रयतेबद्धल छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच विचार आहे असे ते म्हणाले. राज्य मंत्री मंडळात बारा पैकी सात राज्यमंत्री कोकणातले आहेत पुढील काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणाने शिवसेनेला मोठी साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. नारायण राणेचे नाव टाळत देसाई यांनी केसरकर यांचे कौतुक केले यापूर्वीच्या पाकलमंत्रीपेक्षा केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठे प्रकल्प आणि आर्थिक तरतूद केली आहे असे देसाई म्हणाले. केसरकर म्हणाले, खाडीतून नौका पर्यटन होणारच अवैध वाळू उपसा करणारया वाळू माफियांना धडा शिकवू तसेच जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करू असा इशारा त्यांनी दिला. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची आर्थिक तरतूद तयार करण्यात आली आहे. सभागृहात हा विषय चच्रेस आल्यावर हॉस्पिटल होई पर्यंत रुग्णासाठी तोपर्यंतचे धोरण जाहीर करू वेंगुर्लात कवी मंगेश पाडगावकर यांचे स्मारक, कुडाळ  मंच्छिद्रनाथ कांबळी स्मारक आरोंडा ते पालघर पर्यत खारबंधारे असे जिल्ह्यातील आणि कोकणातील अनेक योजनांसाठी तरतूद करण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.  कोकणातील माणसे ज्यावेळी श्रीमंत होतील त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना समाधान वाटेल असे काम मी करत आहे. कोणाला दुखविण्याचे काम आपण करणार नाही असे ते म्हणाले. यावेळी आमदार वैभव नाईक , अरुण दुधवडकर, प्रकाश परब,  बाबुराव धुरी ,जानवी सावंत आदींनी विचार व्यक्त केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena will win the election on its own says subhash desai

ताज्या बातम्या