मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणाऱ्या बंडखोर आमदारांना उंदराची उपमा देत भाषण करणारे अर्जुन खोतकर सोमवारी मुख्यमंत्री शिंदे आणि केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भेटीला पोहोचले होते. यामुळे अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाले आहेत, असा अर्थ काढला जात आहे. पण आपण शिंदे गटात गेलो आहोत, असं खोतकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. दरम्यान यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

Uddhav Thackeray Interview: करोनावर मात ते शिंदेंची बंडखोरी, पाहा उद्धव ठाकरेंची रोखठोक मुलाखत

“अर्जुन खोतकर यांच्याशी दोन दिवसांपूर्वीच मी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी दानवेंना गाडल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं होतं. लोकसभा निवडणूक लढवणार आणि दानवेंना कायमचं घरी बसवेन असं ते म्हणाले होते. दानवेंसंबंधी त्यांनी जे शब्द वापरले आहे त्याचा उच्चार मी करणार नाही,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

‘ईडी’मुळेच खोतकरांची सपशेल नांगी? ; दिल्लीमध्ये मुख्यमंत्र्यांची दानवेंसह भेट

“अर्जुन खोतकर यांची गेल्या काही दिवसातील शिवसेनच्या व्यासपीठावरील भाषणं ऐकली, तर काहीतरी गैरसमज झाला असावा असं वाटतं. जोपर्यंत ते समोरुन सांगत नाहीत तोपर्यंत अर्जुन खोतकर शिवसेनेतच आहेत,” असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जुन खोतकर आणि दानवेंमधील संघर्ष

अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये २०१४ नंतर राजकीय संघर्ष कायम होता. या राजकीय संघर्षांला सिल्लोडचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचेही पाठबळ होतं. अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी गळ त्यांना घातली जात होती. जालना विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे खोतकर शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री होते. या काळात ते भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची ते स्तुती करत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खोतकर यांच्यात मैत्रभाव होता. मात्र, रावसाहेब दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात त्यांना सहभागी करून घेण्यापूर्वी या दोन नेत्यांची दिलजमाई होणे आवश्यक मानले जात होते. सोमवारी अशी दिलजमाई झाली. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनीही दिलजमाईच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र, खोतकर शिंदे गटात गेले की नाही, याची अधिकृत घोषणा झालेली नाही.