रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये चर्चा झाली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे कोण आहेत? अशी विचारणा केली असं ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर उपहासात्मकपणे त्यांनी हे वक्तव्य केलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता असल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला होता.

नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊतांनी सांगितलं की “रशियाचे अध्यक्ष पुतीन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इंग्लडचे राजे प्रिन्स चार्ल्स या तिघांमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल चर्चा झाली. उद्धव ठाकरे कोण आहेत? या माणसाची कमाल आहे. इतकी संकंट आली तरी ते हार मानत नाहीत असं ते म्हणत होते”.

“बिल क्लिंटनही विचारतात Who is Eknath Shinde? केवढं काम करतो! कधी झोपतो? कधी…”; CM शिंदेंचा पत्रकारांसमोर दावा

“उद्या युद्धाची स्थिती निर्माण झाली तर उद्धव ठाकरेंचा सल्ला घ्यावा लागेल. जो बायडन पुतीन यांना उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते. ते म्हणत होते मोदींना विचारा, त्यांनी अजून आपली भेट का करुन दिली नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीदेखील उद्धव ठाकरे कोण आहेत असं विचारत होते,” असं संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की “देशात युद्धाची स्थिती असून सगळं जग निराश आहे. अशावेळी उद्धव ठाकरे लढत आहेत. ही सुद्धा एक सेना, फौजच आहे ना. याचमुळे देशांचे प्रमुख लोक उद्धव ठाकरे कोण आहेत अशी विचारणा करत आहेत”. दरम्यान एकनाथ शिंदेंना टोला लगावताना ते म्हणाले की, “क्लिंटनचा जमाना केव्हाच संपला हे कळलं पाहिजे”.

“बिल क्लिंटनही विचारतात शिंदे कोण?,” CM शिंदेंचा दावा

शिंदे गटाच्या उठावाची दखल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्याकडूनही घेण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. एकनाथ शिंदेंनी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप केला. यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना शिंदेंनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनाही शिंदे गटाच्या उठावाबद्दल उत्सुकता असल्याचं म्हणाले. एका भारतीय व्यक्तीच्या नातेवाईकाकडे क्लिंटन आपल्याबद्दल चौकशी करत होते असा दावा शिंदेंनी पत्रकार परिषदेत केला होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महिन्याभरापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला होता. तो बिल क्लिंटनकडे काम करतो. तो भारतीय माणूस आहे. त्याला त्यांनी विचारलं Who is Eknath Shinde? क्या हैं वो? क्या करता हैं? काय करतो एकंदर? केवढं काम करतो? कधी झोपतो? कधी जेवतो?” असा दावा एकनाथ शिंदेंनी केली.