Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2025 Live Updates, 2 October: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत असून यावेळी उद्धव ठाकरे नेमके कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार? याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी पालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंशी युती होणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याबाबतच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.
UBT Shivtirth Dadar Dasara Melava Live 2025: उद्धव ठाकरे आज काय बोलणार? ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा!
आजच्या मेळाव्यात चिखलफेक होणारच... - संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर पावसामुळं चिखल झाला असून या मेळाव्यातील भाषणात चिखल उडवला जाणार आहे, अशी टीका शिवसेनेकडून (शिंदे) करण्यात आली. या टिकेला उत्तर देत असताना संजय राऊत म्हणाले की, गद्दारांच्या मेळाव्यावर चिखल फेकायचा नाही तर काय फेकायचे? शिवतीर्थावरच्या चिखलात गद्दारांना लोळवावेच लागेल.
दसरा मेळाव्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघत असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आजच्या होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात नाशिकमधून ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते रवाना झाले आहेत.
"कमलताई गवई RSS च्या जाळ्यात फसल्या नाहीत, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड…", संजय राऊत यांचं मोठं विधान
UBT Dasara Melava 2025 Shivtirth Dadar Mumbai Live in Marathi: उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष
ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमक्या कोणत्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य करणार? याविषयी राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाची धोरणं, आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुका, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा, पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, पाकिस्तानशी क्रिकेट सामने, आशिया कपमधील भारतीय संघाचा हस्तांदोलन वाद अशा अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.
UBT Dasara Melava 2025 Shivtirth Dadar Mumbai Live in Marathi: उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष
शिवाजी पार्कवर चिखल झालेला असतानाच ठाकरे गटाकडून मात्र तिथेच मेळावा घेण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मेळाव्यात नेमकं काय होणार? याची चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी सर्वात मोठे आव्हान कोण? यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, त्यांच्यासाठी मीच मोठे आव्हान आहे.
UBT Shivtirth Dadar Dasara Melava Live 2025: ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याबाबतच्या बातम्या एका क्लिकवर