Shrinivas Pawar slams Ajit Pawar Over statement on Family and Politics : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे सहकारी सातत्याने ज्येष्ठ नेते वर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. दरम्यान, आज (२८ ऑक्टोबर) पुन्हा एकदा अजित पवारांनी कौटुंबिक गोष्टी जाहीर सभेत बोलून दाखवल्या. तसेच “शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना बारामतीमधून विधानसभेची उमेदवारी देऊन तात्याराव पवारांचं कुटुंब फोडलं नाही का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार यांनी आज बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मतदारसंघात मोठं शक्तिप्रदर्शन केलं. तसेच कन्हेरी येथे प्रचारसभा घेतली.

दरम्यान, प्रसारमाध्यमांसमोर अजित पवार म्हणाले, “मी सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून उभं करून चूक केली. तीच चूक आता वरिष्ठ (शरद पवार) करत आहेत”. त्यावर, अजित पवारांचे थोरले भाऊ श्रीनिवास पवार म्हणाले, “चूक व्हायच्या आधी आम्ही त्यांना सांगत होतो. त्यांनी तेव्हाच ते थांबवायला पाहिजे होतं. आता झालं गेलं ते त्यांनी सोडून द्यायला हवं.

श्रीनिवास पवार काय म्हणाले?

दरम्यान, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे की त्यांनी तात्याराव पवारांचं (अजित पवार व श्रीनिवास पवार यांचे वडील) घर फोडलं. यावर श्रीनिवास पवार म्हणाले, शरद पवार यांच्या चुका काढण्याइतके दादा (अजित पवार) मोठे झाले आहेत का? ते इतके मोठे कधी झाले हे मलाच माहिती नाही आणि मुळात सुरुवात कोणी केली? एखादा घाव बसल्यानंतर तो घाव बरा होतो, मात्र, त्याचे व्रण तसेच राहतात.

हे ही वाचा >> “मी बारामतीतून निवडणूक लढणार नव्हतो, पण…”, अजित पवार स्पष्टच बोलले; म्हणाले, “मी नौटंकी…”

कन्हेरीतील सभेत अजित पवार म्हणाले, “सर्वांनी एकोप्याने राहायला हवं, भाऊ एकत्र राहिले तर कुटुंब पुढे जातं. या वक्तव्याद्वारे त्यांनी श्रीनिवास पवार यांना या राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे. यावर श्रीनिवास पवार म्हणाले, “मला नाही वाटत की अजित पवार माझ्याबद्दल बोलले असतील. मुळात युगेंद्र पवार याला मी उमेदवारी दिलेली नाही. युगेंद्र त्याचे निर्णय घ्यायला सक्षम आहे. तसेच तो फार पूर्वीपासून शरद पवार यांच्या विचारांवर चालत आला आहे. तो शरद पवारांना त्याचा नेता मानतो. त्याला शरद पवारांचे विचार आवडतात आणि मी काही कुटुंबापासून दूर गेलो नाही. त्याचबरोबर माझा राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे मला यामध्ये कोणीही ओढू नये असं मला वाटतं”. श्रीनिवास पवार टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

Shrinivas Pawar : अजित पवारांची आई कोणाच्या बाजूने? उपमुख्यमंत्र्यांनी भर सभेत कौटुंबिक गोष्टी सांगितल्या; थोरला भाऊ म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांवरील टीकेला उत्तर

दरम्यान, तात्यारावांचं घर म्हणजेच दोन भाऊ फुटले, अशा आशयाचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यावर श्रीनिवास पवार म्हणाले, “मी तसं काही मानत नाही. अजित पवार यांच्या डोक्यात असले विचार येत असतील तर त्यावर मी काही बोलणार नाही. मी सर्वांना एकच समजतो. राजकारणी लोकांचं राजकारण चालू राहतं. परंतु, कोणीही घरातील गोष्टी बाहेर मांडू नयेत आणि कुणी त्यावर बोलत असेल तर मला त्याची कल्पना नाही”.