उद्धव ठाकरे हे कायमच मी बाळासाहेबांचा विचार सांगणार कारण मी त्यांचा वारसदार आहे असं त्यांच्या भाषणांत सांगतात. तर एकनाथ शिंदे हे आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आहोत असं सांगतात. अगदी असंच राज ठाकरेही सांगतात की बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसदार मी आहे. अशात स्मिता ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना एका मुलाखतीत टोला लगावला आहे. इतकंच नाही तर राज ठाकरेंची राजकारणात आधी एंट्री झाली तेव्हा उद्धव ठाकरे फोटो काढत होते असंही स्मिता ठाकरे म्हणाल्या आणि त्यांना टोलाही लगावला आहे.

उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर

उद्धव ठाकरे हे राजकारणात नव्हते. सर्वात आधी राजकारणात राज ठाकरेच आले होते. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची शैली आत्मसात केली होती. राज ठाकरे राजकारणात आले, मोठे झाले तोपर्यंत उद्धव ठाकरे फोटोग्राफर झाले. एक दिवस अचानक उद्धव ठाकरेंनाही वाटू लागलं की मलाही राजकारणात यायचं आहे. ते राजकारणात आले, त्यामागची कारणं मला माहीत नाहीत. पण ते आले हे काही वाईट झालं नाही. पण पुढे जे काही घडलं तिथे काय बिघडलं ते मला माहीत नाही. असं स्मिता ठाकरे म्हणाल्या आहेत.

Jitendra-Awhad
“निवृत्त न्यायाधीशांनाही कळू लागले आहे की…”, ‘त्या’ पत्रावरून जितेंद्र आव्हाडांची टीका
Supriya Sule, Amol Kolhe, Ajit Pawar taunt,
खासदार डॉ. अमोल कोल्हे हे एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी – सुप्रिया सुळे
Supriya Sule
“सगळे पुरूष माझ्याविरोधात…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य; म्हणाल्या, “मी स्वाभिमानी मुलगी, मोडेन पण वाकणार नाही!”
loksatta readers opinion on editorial readers reaction on loksatta news
लोकमानस : वंचित नव्हे, मविआच भाजपची ‘बी टीम’?

मी राजकारणात येण्याचा हट्ट धरला नाही

उद्धव आणि राज हेच राजकारणात होते. मी तेव्हा राजकारणात तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. मी राजकारणात येण्याचा हट्टही धरला नाही. मी शिवसेनेत आहे असंही मी कुणाला सांगत नसे. बाळासाहेबांनी मला कायमच चांगली शिकवण दिली. त्यांनी मला राजकारणाच्या बाहेर ठेवलं नाही. बाळासाहेब ठाकरेंचा खूप चांगला सहवास मला मिळाला. त्यांनी मला राजकारण आणि समाजकारण या दोन्हींसाठी मार्गदर्शन केलं.

मीच वारसदार अशी वृत्ती असेल तर

“शिवसेनेची जी काही अवस्था झाली आहे ती पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला यातना होत असतील. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जेव्हा एकमेकांपासून वेगळे होत होते तेव्हा मी त्या दोघांना थांबवण्याचा, समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र काही गोष्टी खूप खोलवर गेलेल्या असतात, ज्या मनात राहतात. तसंच अनेकदा काहींचे उद्देश असेच असतात की आम्हीच वारसदार आहोत. ही वृत्ती ज्याच्या डोक्यात आहे तोच स्वतःला वारसदार म्हणवतो. मग इतर लोकांचं महत्व त्यांना राहात नाही. अशा वृत्तीने कुणी चालणार असेल तर पक्ष एकसंध कसा राहिल?” असं स्मिता ठाकरे म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा- “राज आणि उद्धव वेगळे होऊ नयेत म्हणून मी खूप प्रयत्न केले, आज बाळासाहेब…”, स्मिता ठाकरेंचं वक्तव्य

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या नात्यात दुरावा आला होता का?

“माँ (मीनाताई ठाकरे) जेव्हा गेल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे खूप भावनिक झाले होते. मी तेव्हा त्यांच्याबरोबर होते. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात काय झालं ते मला माहीत नाही. आम्ही (मी आणि बाळासाहेब) या विषयावर कधी बोललोही नाही. मी कायम त्यांच्याकडून जितकं चांगलं शिकता आलं तेवढं मी शिकले. माझं आणि त्यांचं नातं गुरु शिष्याचं आहे. मी आज जे काही शिकले आहे ते सगळं बाळासाहेबांमुळेच शिकले आहे.”