सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना आणि सध्या अजित पवार यांचा दुसरा गट अस्तित्वात असताना या पक्षात मोहोळ तालुक्यातील वजनदार नेते राजन पाटील-अनगरकर आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता टोकाला गेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना, त्याच मुहूर्तावर राजन पाटील यांच्या विरोधात मोहोळ बंद पुकारण्यात आला. त्यामुळे अखेर अजित पवार यांना उमेश पाटील यांच्या उपद्रवाची दखल घ्यावी लागली.

मोहोळ तालुक्यात माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील हे दोघे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात असताना त्यांच्यातील गटबाजी सुरूच आहे. राष्ट्रवादी एकसंघ असताना शरद पवार यांच्यासमोर आणि आता राष्ट्रवादी अजित पवार गट अस्तित्वात असताना खुद्द अजित पवार यांच्यासमोर ही गटबाजी वेळोवेळी पहावयास मिळाली आहे. परंतु पवार काका-पुतण्याने या गटबाजीकडे कानाडोळाच केला. या पार्श्वभूमीवर अलीकडे राजन पाटील यांच्या गावात, अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय झाले आहे. या अप्पर तहसील कार्यालयास त्यांच्या विरोधकांची गावे जोडली गेल्यामुळे सर्व विरोधक नवीन अप्पर महसूल कार्यालय मंजुरीच्या विरोधात एकवटले आहेत. या प्रश्नावर उमेश पाटील यांच्या गुणाकारांनी सर्वपक्षीय आंदोलन सुरू आहे. याचाच भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे जनसन्मान यात्रा घेऊन मोहोळमध्ये आले असताना नेमका तोच मुहूर्त साधून मोहोळ तालुका बचाव समितीने मोहोळ बंद पुकारला होता. तसेच अजित पवार यांचा दौरा रद्द होणार असल्याची आवई उठवण्यात आली होती.

Dr. Nitin Raut, Dr. Milind Mane
उत्तर नागपूरमध्ये तिसऱ्यांदा राऊत- माने लढत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Nagpur BSP, Vanchit Nagpur, division of votes Nagpur,
नागपूर : बसप, वंचित पुन्हा मैदानात; मतविभाजनामुळे, काँग्रेस, भाजपच्या तोंडचा घास…
Kelzar, Leopard died Wardha, Leopard latest news,
वर्धा : प्रजननकाळच बिबट्यांच्या जीवावर उठतोय, जंगल सोडून रस्त्यावर येतात, आणि….
Rashtriya Swayamsevak Sangh
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; शतकानंतरची वाटचाल!
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
objective of implementing the mgnrega
लेख : ‘मनरेगा’च्या मूळ हेतूंकडे दुर्लक्ष नको!
clash by Vanchit Bahujan Aghadi workers in Yogendra Yadavs meeting
योगेंद्र यादव यांच्या सभेत वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; धक्काबुक्की, घोषणाबाजी अन् खुर्च्यांची तोडफोड

हेही वाचा – Hasan Mushrif : हसन मुश्रीफांची समरजिसिंह घाटगेंवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “अशा लोकांच्या…”

हेही वाचा – Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर असा घडला अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर, वाचा चकमकीचा घटनाक्रम

ही बाब अजित पवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत त्यांनी उमेश पाटील यांचा थेट नामोल्लेख टाळून आपण राजन पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचा निर्वाळा दिला. आपला दौरा रद्द करायला अजून कोणी जन्माला आला नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही राजन पाटील यांना पत्र देणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. तथापि, दुसरीकडे उमेश पाटील यांनी आपल्या भूमिकेत बदल न करता राजन पाटील आणि त्यांचे समर्थक आमदार यशवंत माने यांच्या विरोधात पवित्रा कायम ठेवला आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्याआधी राजन पाटील यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा अधिकृत उमेदवार अद्यापि जाहीर झालेला नसताना मोहोळमध्ये राजन पाटील यांनी आमदार यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हा अधिकार त्यांना कोणी दिला, त्यांची ही एकाधिकारशाही लोकशाहीत बसते का, असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे.