सोलापूर : शासनाने गेल्या १० जून रोजी नव्यानेच जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नवीन किमान वेतन १९ हजार ५९६ रुपये ठरविले आहे. मात्र राज्यभरात यंत्रमाग कामगारांना आठ तासांच्या कामासाठी पीस रेटवर आधारित आणि ६० ते ७० टक्के कार्यक्षमतेने २६ हजार रुपये किमान वेतन निश्चित करण्याची मागणी सिटूप्रणीत राज्य यंत्रमाग कामगार फेडरेशनने केली आहे. याबाबतच्या सूचना व हरकती कामगार आयुक्तांकडे येत्या १० ऑगस्टपर्यंत नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य यंत्रमाग कामगार फेडरेशनची बैठक सोलापुरात सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती आडम यांनी दिली. या बैठकीत दत्ता माने भरमा कांबळे (इचलकरंजी), सुनील चव्हाण (भिवंडी), तुकाराम सोंजे (मालेगाव), व्यंकटेश कोंगारी (सोलापूर) आदींसह सुमारे एक हजार प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा – “येत्या काळात बरेच धमाके होणार, अनेकजण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

किमान वेतन निश्चितीसंबंधीच्या नव्या अधिसूचनेवर हरकती पाठवणे, यंत्रमाग कामगारांसाठी घरकुलांकरिता प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, येत्या २ ऑगस्ट रोजी भिवंडी येथे राज्य यंत्रमाग कामगार फेडरेशनचे अधिवेशन आयोजित करणे आदी विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा – सांगली : मिरज, जत विधानसभा जागांची जनसुराज्यकडून मागणी – कदम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिवंडी येथे होणाऱ्या राज्य यंत्रमाग कामगार फेडरेशनच्या अधिवेशनचे अध्यक्षस्थानी नरसय्या आडम राहणार असून माकपचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे यांच्या उपस्थितीत सिटूचे प्रदेशाध्यक्ष डी. एल. कराड यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. त्यावर या राज्य बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.