सोलापूर : सोलापूरपासून शंभर किलोमीटर अंतरावर कर्नाटकातील ऐतिहासिक पर्यटनाचे क्षेत्र असलेल्या विजयपूर शहरात बेपत्ता झालेली तीन मुले मृतावस्थेत आढळून आली. अनुष्का अनिल दहिहंडे (वय ९), तिचा भाऊ विजय अनिल दहिहंडे (वय ७) आणि त्यांच्या नात्यातील माहीर जानगवळी (वय ६) अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. विजयपुरात गच्चीनकट्टी वसाहतीत राहणा-या वीरशैव गवळी समाजाच्या जानगवळी यांच्या घरी उन्हाळी सुट्टीत गदग (कर्नाटक) येथून दहिहंडे कुटुंबीय आले होते.

हेही वाचा : पुण्यात मतदानाचा टक्का वाढला; शिरूर, मावळमध्ये झाली घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जानगवळी कुटुंबातील मिहीर याजबरोबर अनुष्का आणि विजय ही भावंडे खेळत खेळत एका उंटामागे गेली होती. ती बेपत्ता झाल्यामुळे त्यांचा शोधाशोध झाला. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात तिन्ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदविण्यात आली होती. तथापि, सोमवारी दुपारी उशिरा इंडी रस्त्यावर विजयपूर महापालिकेच्या मलनिःसारण केंद्राच्या नाल्यामध्ये तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. हा प्रकार अपघाती आहे की घातपाताचा, हे लगेचच समजू शकले नाही.