सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा दिवंगत ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यंदा नामवंत कवी वैभव जोशी यांना जाहीर झाला आहे.

दहा हजार रुपये रोख, रजत कमळ आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या रविवारी, ८ जून रोजी सायंकाळी ६ वाजता श्री. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक (ॲम्फी थिएटर) सभागृहात हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुहास पुजारी यांच्या हस्ते आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार वितरणानंतर कवी वैभव जोशी यांचा काव्यवाचनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष सायली जोशी यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वी डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अनिल अवचट, प्रा. मिलिंद जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे, क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी, डॉ. अरुणा ढेरे, सुनील शिनखेडे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांना दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार देण्यात आला आहे.