अलिबाग : अलिबाग पेण मार्गावर कार्लेखिंड येथे एस टी बसला अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका बाजूला बॅरीगेटवर कलंडली. बसमधील प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून पोलीस व अन्य यंत्रणांच्या सहाय्याने गाडी सरळ करण्यात आली. ही बस अलिबाग हून पनवेलकडे निघाली होती.
हेही वाचा…छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
४० ते ५० प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. बस रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्यांना आणि झाडांना अडकल्याने मोठी दुर्घटना टाळली. या अपघातात ३ ते ४ जण किरकोळ जखमी झाले. त्यांना अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.