छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धकालीन शस्त्र असलेली वाघनखे ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियम’मधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार लंडनला जाणार आहेत. रविवारी (१ ऑक्टोबर) रात्री ते लंडनला रवाना होणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, विशेष कार्यकारी अधिकारी अमोल जाधव हेही मुनगंटीवार यांच्याबरोबर जाणार आहेत.

हे सर्वजण १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ‘ब्रिटिश एअरवेज’च्या विमानाने लंडनकडे रवाना होतील. तत्पूर्वी सुधीर मुनगंटीवार मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचतील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील.

हेही वाचा- “अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष प्रारंभ होताच ही वाघनखे भारतात परत आणण्याचा संकल्प सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. १५ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे ब्रिटेनचे पश्चिम भारत उप उच्चायुक्त अँलेन गँमेल यांच्यासह ब्रिटनच्या राजकीय व द्विपक्षीय संबंध उपप्रमुख इमोगेन स्टोन यांच्यासोबत बैठक घेवून महाराष्ट्र शासनाने व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाशी पत्रव्यवहार सुरू केला. मंगळवारी (३ ऑक्टोबर) सुधीर मुनगंटीवार व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमला भेट देतील. त्यानंतर संग्रहलायचे संचालक ट्रायस्टम हंट यांच्याबरोबर त्यांची बैठक होईल व करारावर स्वाक्षऱ्या होतील.