माजी मंत्री व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील कट्टर मुंडे समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुकुंद गर्जे असं या पंकजा मुंडे समर्थकाचं नाव आहे. त्यांनी रोगर हे किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावलले जात असल्याचा आरोप या समर्थकाने केलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थक मुकुंद गर्जे यांना उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीला पुढील धोका पाहता त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा : “बहीण म्हणून पंकजा मुंडेंशी शिवसेनेत येण्याबाबत बोलेन, परंतु…”; अर्जून खोतकर यांचं मोठं वक्तव्य

पंकजा मुंडे यांना राजकारणात सातत्याने स्वतःच्याच पक्षाकडून डावलले जात असल्याने विष प्राशन केल्याचं समर्थक मुकुंद गर्जे यांनी म्हटलंय.

मुंडे समर्थक मुकुंद गर्जे यांचं म्हणणे काय?

मुकुंद गर्जे म्हणाले, “पंकजा मुंडे यांना विधान परिषद उमेदवारी द्यावी आणि विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद द्यावं असं आम्हाला वाटत होतं. मात्र, त्यांना वेळोवेळी डावललं जात आहे. गोपीनाथ मुंडे असते तर असं करण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री बीडमध्ये येऊन पंकजा मुंडेंचं कौतुक करतात, मग महाराष्ट्रात कळत नाही का? हे कोणतं राजकारण सुरू आहे.”

“मी आंदोलन करून थकलो”

“भाजपा वेळोवेळी पंकजा मुंडे यांना डावलणार असेल तर मी त्याविरोधात आंदोलन करून थकलो आहे. आता मला हे सहन होत नाहीये. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी मी पत्रकार परिषद बोलावली आहे,” असं म्हणत मुकुंद गर्जे यांनी भर पत्रकार परिषदेत विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supporter of pankaja munde attempt to suicide against bjp in ahmednagar pbs
First published on: 09-06-2022 at 20:10 IST