जर सरकार बदललं नसतं, तर एवढा मोठा सोहळा घेऊ शकलो नसतो. कारण, महाराष्ट्र सरकारनं आपल्याला करोना असल्याचं सांगत घरी बसवलं असतं. जेव्हा जेव्हा अधिवेशन आलं, तेव्हा माध्यमांना सांगायचं करोना आला, पळा… पळा. पण, जेव्हा मी आरोग्यमंत्री झालो, तेव्हा प्रत्येकवेळी सांगितलं की, करोनाला घाबरून घरात बसण्याची गरज नाही, असं विधान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे. ते परभणीत एका कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तानाजी सावंत यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. “आपण शिवसैनिक म्हणजे विस्थापित असणारे. काँग्रेस-राष्ट्रवादीवाले प्रस्थापित लोक. आपण एकमेकांची थोबाडं बघत नाहीत. पण, हा माणूस उठला ( उद्धव ठाकरे ) आणि सरळ त्यांच्या मांडीवर जाऊन बसला. एका पदासाठी आपले तत्कालीन पक्षप्रमुख शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसत असेल, तर ही खेदाची गोष्ट आहे,” अशी टीका तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

हेही वाचा : “उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला, पण…”, दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यावर फडणवीसांचा हल्लाबोल

यावेळी बोलताना तानाजी सावंत यांनी अधिकाऱ्यांना इशाराही दिला आहे. “अजूनही प्रशासनाच्या डोक्यातून जर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता गेली नसेल, तर माझा रस्त्यावरील शिवसैनिक तुमच्या डोक्यातील प्रशासन पायावर आणल्याशिवाय राहणार नाही.”

हेही वाचा : “एनडीएचा घटकपक्ष, तरीही भाजपाकडून सापत्न वागणूक”, कीर्तिकरांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

“कारण, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचे प्रश्न मांडत असतो. जर, तुम्हाला आमचं सरकार पचत नसेल, तर आयएसएस, आयपीएस अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर बदली करून जा. कोणत्याही आयएसएस, आयपीएस अधिकाऱ्याला औकात दाखवण्याची ताकद शिवसैनिकात आहे,” असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tanaji sawant attacks uddhav thackeray and warning ias ips officer in parbhani ssa
First published on: 26-05-2023 at 22:32 IST